मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या मंदीचं सावट आहे. डॉलरचं मूल्य सतत वरखाली होत आहे. दुसरीकडे क्रूड ऑईलच्या किंमती कमी होऊन देखील पेट्रोल डिझेलचे दर अजूनही सगळीकडे स्वस्त झाले नाहीत. काही शहरांमध्ये आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं आहे. सरकारी तेल कंपन्यांनी नवे दर जारी केले आहेत. काही राज्यांमध्ये आज पेट्रोलचे दर स्वस्त झाले आहेत. तर काही राज्यांमध्ये वाढ झाली आहे. चांगली गोष्ट म्हणजे देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत बॅरलमागे 92.37 डॉलरपर्यंत घसरली आहे. WTI प्रति बॅरल 87.13 डॉलरवर पोहोचली आहे. बिहारमध्ये आज पेट्रोल 51 पैशांनी कमी होऊन 109.15 रुपये प्रति लीटर तर डिझेल 48 पैशांनी 95.80 रुपये प्रति लीटरवर आलं आहे. पंजाबमध्ये, पेट्रोल 22 पैशांनी घसरून 96.68 रुपये लिटर आणि डिझेल 21 पैशांनी घसरून 87.03 रुपये लिटरवर पोहोचलं आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 15 पैशांनी कमी होऊन 108.54 रुपये तर डिझेलसाठी लिटरमागे 93.78 रुपये मोजावे लागत आहेत. उत्तर प्रदेशातही पेट्रोल 20 पैशांनी घसरून 96.51 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.67 रुपये प्रति लिटरवर आले आहे. हिमाचल, गुजरात आणि तेलंगणामध्ये दरात वाढ झाली आहे. हे वाचा-दिवाळीमध्ये कांद्याला येणार ‘सोन्यासारखा भाव’, किंमत वाढण्यामागे हे कारण
शहरांची नावं | पेट्रोल दर लिटरमागे | डिझेल दर लिटरमागे |
---|---|---|
मुंबई | 106.31 | 94.27 |
कोलकाता | 106.03 | 92.76 |
दिल्ली | 96.72 | 89.62 |
चेन्नई | 102.63 | 94.24 |
नोएडा | 96.92 पेट्रोल/लिटर | 90.08 पेट्रोल/लिटर |
---|---|---|
गाजियाबाद | 96.26 | 89.45 |
लखनऊ | 96.57 | 89.76 |
पटना | 107.59 | 94.36 |
हे वाचा-सौरभ मुखर्जींना कोणत्या शेअर्सवर भरोसा? मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी दिला गुरू मंत्र पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला SMS द्वारेही मिळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात. रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर बदलतात. त्यावर एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन, वॅट यासोबत अन्य काही टॅक्सचा समावेश केल्यानंतरचे दर तुम्हाला दिसतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलची किंमत वाढते. ऐन सणासुदीच्या काळात पेट्रोल-डिझेल महाग झाल्याने चिंता वाढली आहे.