जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol Diesel Prices: 2 राज्यांमध्ये सर्वात महाग झालं पेट्रोल आणि डिझेल, पाहा तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Prices: 2 राज्यांमध्ये सर्वात महाग झालं पेट्रोल आणि डिझेल, पाहा तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Prices:  2 राज्यांमध्ये सर्वात महाग झालं पेट्रोल आणि डिझेल, पाहा तुमच्या शहरातील दर

क्रूड ऑईलचे दर वाढल्यानंतर भारतातील कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. क्रूड 0.11 टक्क्यांच्या वाढ झाली आहे. प्रति बॅरल 80.70 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.15 टक्क्यांनी वाढून 85.12 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. क्रूड ऑईलचे दर वाढल्यानंतर भारतातील कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. दोन राज्यांमध्ये पेट्रोल डिझेल महाग झालं आहे. तर एक राज्यात स्वस्त झालं आहे. तेलंगणा आणि मिझोराम राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराच्या किंमतीमध्ये मोठी तफावत जाणवत आहे. तेलंगणामध्ये पेट्रोल 1.56 रुपयांनी आणि डिझेल 1.46 रुपयांनी महाग झालं आहे. मिझोराममध्ये 99 आणि 91 पैशांनी स्वस्त झाले आहे.

रेल्वे रुळाला गंज का लागत नाही? कधी विचार केलाय? इंट्रेस्टिंग आहे कारण

पंजाबमध्ये पेट्रोल 29 पैशांनी 97.61 रुपये आणि डिझेल 28 पैशांनी 87.95 रुपये स्वस्त झालं आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 37 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी स्वस्त झालं आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात इंधनाच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर मध्यरात्री रेल्वेतून उतरल्यावर सकाळपर्यंत तिथेच थांबल्यास प्लॅटफॉर्म तिकीट लागतं का? उत्तर जाणून घ्या

News18लोकमत
News18लोकमत

तुम्ही घसबसल्या आता दर चेक करू शकता. तुम्ही या किमती फक्त एसएमएसद्वारेच तपासू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक, त्यांच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी, चेक RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 वर पाठवा. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस पाठवतात. BPCL ग्राहकांनी RSP<डीलर कोड> 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर काही मिनिटांत तुम्हाला एसएमएसद्वारे नवीन किंमती मिळतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात