मुंबई, 28 नोव्हेंबर: कोरोना संकटामध्ये केंद्र सरकार सामान्य लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आता कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) मोठी सूट दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना जीवनाचा दाखला (Life Certificate) देण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. पेंशनर्स (Pensioners) आता 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतात.
1 कोटी पेंशनर्सना फायदा
देशातल्या 1 कोटी पेन्शधारकांना याचा फायदा होणार होणार आहे. सामान्यपणे हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत असते. दरवर्षी 30 नोव्हेंबरच्या आधी पेंशनधारकांना आपण जिवंत असल्याचा दाखला सादर करावा लागतो. अन्यथा पेंशन बंद होण्याची चिंता असते. पण कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांना घाईघाईने हयातीचा दाखला सादर करावा लागू नये यासाठी सरकारने 3 महिन्यांची वाढीव मुदत दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आता 28 फेब्रुवारीपर्यंत हयातीचा दाखला सादर करू शकतात.
ऑनलाइन सादर करा हयातीचा दाखला
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) घरबसल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) सादर करण्याची सुविधा सुरू केली आहे. यामुळे बँकेत होणारी गर्दी टाळता येईल. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना https://locator.csccloud.in/ किंवा http://ccc.cept.gov.in/covid/request.aspx या संकेतस्थळावर जावं लागणार आहे. कोरोना काळात खासकरुन ज्येष्ठ नागरिकांना गर्दीमध्ये तासंतास वेळ उभं राहण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या व्यतिरिक्त जवळच्या पोस्टामध्ये जाऊनही तुम्हाला हयातीचा दाखला सादर करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pensioners