जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पारले-जी लवकरच पोलंडच्या मोठ्या ब्रँडची खरेदी करणार?

पारले-जी लवकरच पोलंडच्या मोठ्या ब्रँडची खरेदी करणार?

पारले-जी लवकरच पोलंडच्या मोठ्या ब्रँडची खरेदी करणार?

कंपनी पोलंडची डॉ. जेरार्ड (Dr Gerard) ही कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई : खरं तर बिस्किट नावाचा पदार्थ असतो, याची ओळख भारतीयांना पारले-जीने करून दिली. पारले-जी बिस्किट समज येईपर्यंत तरी प्रत्येकाच्या आवडीचं बिस्किट असतंच. पारले-जी ब्रँडला कोणत्याच ओळखीची गरज नाही. हा भारतातला सर्वांत जुना बिस्किटांचा ब्रँड आहे. हा ब्रँड आता बिझनेस विस्तार करण्याच्या विचारात आहे. त्या दिशेने पहिलं पाऊल टाकत कंपनी पोलंडची डॉ. जेरार्ड (Dr Gerard) ही कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. 1993 मध्ये झाली होती डॉ. जेरार्डची स्थापना इंडिया टुडे चॅनलवरील रॉयटर्सच्या एका रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, भारतीय बिस्किट निर्माता पारले प्रॉडक्ट्स लवकरच पोलंडची कंपनी डॉ.जेरार्डची खरेदी करू शकते. या डीलबाबत पारले प्रायव्हेट इक्विटी फर्म ब्रिजपॉईंटशी (Bridgepoint) बोलणी करत आहे. महत्त्वाचं म्हणजे 1993 मध्ये स्थापन झालेली डॉ. जेरार्ड कंपनी ब्रिजपॉईंटने 2013 साली फ्रान्सच्या ग्रुप पॉल्टकडून विकत घेतली होती. 200 प्रॉडक्ट्स बनवते कंपनी कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, पोलंडमधील कंपनी डॉ. जेरार्ड 200 हून अधिक प्रॉडक्ट्स तयार करते. त्यात विविध प्रकारची बिस्किटं आणि नमकीन स्नॅक्सचा समावेश आहे. कंपनी या प्रॉडक्ट्सची 30 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. ब्रिजपॉईंटने या वर्षाच्या सुरुवातीला डॉ. जेरार्डमधून बाहेर पडण्यासाठी इनव्हेस्टमेंट बँकर हुलिहान लोकीची नियुक्ती केली होती, परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे प्रक्रियेला वेग आला नाही आणि गोष्ट अर्ध्यावरच थांबली. कंपनीकडून डीलबाबत भाष्य नाही दरम्यान, अद्याप या डीलबद्दल पारले, ब्रिजपॉईंट किंवा डॉ. जेरार्ड यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पोलंडच्या या बिस्किट निर्मात्या कंपनीची अंदाजे किंमत 10 ते 12 अब्ज रुपये असल्याचं अहवालात म्हटलंय. दुसरीकडे या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीचा हवाला देत, असं म्हटलंय की कंपनीची व्हॅल्यू वाढून ती 24 अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    पारले कंपनीचा इतिहास पारले कंपनीची सुरुवात 1929 मध्ये झाली होती आणि कंपनीने पहिल्यांदा 1938 मध्ये पारले-ग्‍लुको नावाने बिस्किटांचं उत्पादन सुरू केलं होतं. स्वातंत्र्यापूर्वी पारले-जीचं नाव ग्लूको बिस्किट होतं. मात्र, 1980 नंतर हे नाव बदलून पारले-जी ठेवण्यात आलं होतं. पारले कंपनी डॉ. जेरार्ड कंपनीची खरेदी करतेय की नाही, हे येत्या काळात कळेलच.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात