मराठी बातम्या /बातम्या /मनी /क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत आहात सावधान; तुमचीही होऊ शकते 'अशी' फसवणूक

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत आहात सावधान; तुमचीही होऊ शकते 'अशी' फसवणूक

गेल्या काही वर्षांपासून देशात क्रिप्टो-करन्सीमधील गुंतवणूक वाढत आहे. मात्र यामाध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून देशात क्रिप्टो-करन्सीमधील गुंतवणूक वाढत आहे. मात्र यामाध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून देशात क्रिप्टो-करन्सीमधील गुंतवणूक वाढत आहे. मात्र यामाध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Bangalore [Bangalore], India

  बेंगळुरू : गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल आर्थिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या डिजिटल आर्थिक सुविधांमुळे डिजिटल पेमेंटचं प्रमाणही लक्षणीय वाढलं. याची सवय होत असतानाच नव्याने क्रिप्टो-करन्सी हा विषय भारतात रूढ होऊ लागला. शेअर मार्केटप्रमाणे क्रिप्टो या डिजिटल चलनात गुंतवणूक करता येते आणि त्यातून मोठा नफा कमवता येतो असं लक्षात आल्यानंतर अनेकांनी हे चलन वापरण्यासही सुरुवात केली.

  पण या करन्सीचा वापर करणाऱ्या अनेकांची घोटाळ्यांमुळे फसवणूकही झाली आहे. बेंगळुरूत गेल्या वर्षभरात क्रिप्टो-ट्रेडिंग संदर्भात 70 कोटी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. पोलिसांनी ऑनलाईन गुंतवणूक करताना सावध राहण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’नं दिलं आहे.

  तरुणाला लाखोंचा गंडा 

  बेंगळुरूतील 28 वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाला 10 ऑक्टोबर 2022 ला ‘लिली’ या नावाने एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला. त्यानंतर त्याने या अकाउंटवरील व्यक्तीशी सुमारे तीन महिने चॅटिंग केलं. यादरम्यान लिलीने भारतात येऊन या तरुणाच्या कुटुंबाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. गप्पा मारताना त्या तरुणाने आपल्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणीबद्दल लिलीला माहिती दिली. त्यानंतर लिलीने त्याला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक पोर्टल सुचवलं. या पोर्टलवर तिने ट्रेड केलं आहे असंही सांगितलं.

  त्यानंतर तरुणाने सुरुवातीला 3.5 लाख रुपये क्रिप्टोकरन्सीत गुंतवले. त्या पुढच्या दोन महिन्यांत त्याने विविध बँकांकडून कर्ज घेऊन तसंच त्याच्या गर्लफ्रेंडला 25 लाख रुपयांचं कर्ज घ्यायला भाग पाडून पुन्हा क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक केली. एकूणात 59 लाख रुपये गमवल्यावर या तरुणाला लक्षात आलं की त्याची फसवणूक झाली आहे.बेंगळुरूत झालेल्या अनेक क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यांच्या बळींपैकी एक बळी हा सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुण ठरला.

   274 कोटी रुपयांची फसवणूक 

  2022 मध्ये बेंगळुरूत क्रिप्टोकरन्सीशी संबंधित घोटाळ्यात अंदाजे 274 कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, त्यापैकी क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग करताना झालेली फसवणूक 70 कोटी रुपये म्हणजे एकूण रकमेच्या 25 टक्के इतकी आहे. 2021 च्या तुलनेत क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमधील फसवणुकीचं प्रमाण 624 टक्क्यांनी वाढलं आहे. ग्लोबल क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज क्यूकॉइनने ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर केलेल्या माहितीनुसार भारतात 115 मिलियन क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदार आहेत. क्रिप्टोकरन्सीसंबंधी केसमध्ये गुन्हेगारांनी वापरलेली मोड्स ऑपरेंडी क्लिष्ट असल्याने त्या केसेस सोडवणं कठीण जात असल्याचं बेंगळुरू पोलिसांचं म्हणणं आहे.

  सोशल मीडियाचा वापर  

  क्रिप्टोक्राइम पोलीस स्टेशनशीसंबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं, ‘ साधारणपणे फेसबुक आणि इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींच्या माध्यमातून हे घोटाळे केले जातात. घोटाळेबाज जाहिरातीतून काही मिनिटांत प्रचंड नफा होईल असं सांगतात त्यामुळे लोक पट्कन त्यांच्या जाळ्यात अडकतात. पिग बुचरिंग किंवा रोमान्स स्कॅमच्या माध्यमातून घोटाळेबाज संभाव्य व्यक्तीशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चॅटिंग करतात.

  एकदा का चॅटिंगमधून विश्वास संपादन केला की ते त्या व्यक्तीला क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करायला प्रोत्साहित करतात. आपल्याकडे इनसायडर टिप्स असल्याने नक्कीच आपण मोठा नफा कमवून देऊ शकतो अशी बतावणीही ते करतात. त्या घोटाळेबाजांनी चालवलेल्या क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करणाऱ्या अ‍ॅप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून ते त्या व्यक्तीला गुंतवणूक करायला लावतात.

  फसवे अ‍ॅप

  हे अ‍ॅप किंवा वेबसाईट ही त्या व्यक्तीला ऑथेंटिक वाटते. एकदा का या गुंतवणूकदाराने मोठी रक्कम गुंतवली की त्याची ट्रॅन्झॅक्शन्सच ब्लॉकचेन सिस्टिममध्ये दिसणं बंद होतं. ब्लॉकचेन म्हणजे अशी यंत्रणा असते जी विविध कॉम्प्युटरवरील क्रिप्टोकरन्सीतील व्यवहारांची नोंद ठेवते. ते प्लॅटफॉर्मच खोटे असल्याने अचानक केलेली गुंतणूकच दिसणं बंद होतं म्हणजे त्या गुंतवणूकदाराला तितक्या पैशांचा गंडा बसतो.’ अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या तपास संस्थेच्या म्हणण्यानुसार हे क्रिप्टो करन्सीसंबंधी घोटाळे हे स्क्रिप्टेड आणि कॉन्टॅक्ट इंटेन्सिव्ह असतात. ‘आपल्या मोबाईल फोनवर जे फसवे मेसेज येतात तसे क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यांचे मेसेजेसही मोठ्या प्रमाणात पाठवले जातात.

  मुख्यत्वेकरून गुंतवणूकदारांना हे मेसेज पाठवले जातात. काही जणं त्याला बळी पडतात. गुंतवणूक करून फसवण्यायोग्य व्यक्तींशी संपर्क करण्यासाठी घोटाळेबाज सोशल मीडिया या साधनाचा पुरेपूर वापर करतात. अशीच बेंगळुरूतील 23 वर्षांच्या एका तरुणाची फसवणूक झाली होती त्याने पहिल्यांदा पाच हजार रुपये गुंतवले आणि नंतर मोठा तोटा त्याला झाला. त्यामुळे नागरिकांनी सावध रहायला हवं,’ असं आवाहन सायबर क्राइम विभागातील पोलीस अधिकाऱ्याने केले आहे.

  First published:
  top videos

   Tags: Bengaluru, Cryptocurrency