• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा; पावसानं झालेलं नुकसान भरून निघण्याची अपेक्षा

घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा; पावसानं झालेलं नुकसान भरून निघण्याची अपेक्षा

कांद्याचे दर आणखी वाढण्याची शेतकऱ्यांना (onion wholesale rate) अपेक्षा आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे 40 ते 50 टक्के पीक बहुतेक जिल्ह्यांमध्ये सडले आहे.

 • Share this:
  मुंबई, 14 ऑक्टोबर : कांद्याला बाजारसमितीत चांगला दर (onion price) मिळत असल्यानं कांदा (onion) उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कांद्याची घाऊक किंमत 4393 ते 4700 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचली आहे. कांद्याला हंगामात मिळालेला हा सर्वाधिक भाव असल्याचे सांगण्यात येत आहे. कांद्याचे दर आणखी वाढण्याची शेतकऱ्यांना (onion wholesale rate) अपेक्षा आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे 40 ते 50 टक्के पीक बहुतेक जिल्ह्यांमध्ये सडले आहे. त्यामुळे चांगले दर मिळाल्यास झालेले नुकसान भरून निघण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. आशियाची सर्वात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव येथे बुधवारी काद्याची कमाल किंमत 4134 रुपये होती, तर किमान 1200 रुपये आणि सर्वसाधारण किंमत 3550 रुपये होती. कोल्हापूरच्या बाजार समितीत जास्तीत जास्त दर 4700 इतका होता. कांद्याचा वापर साधारणपणे कमी असताना हा दर नवरात्रीसाठी असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शुक्रवारपासून कांद्याचे दर आणखी वाढू शकतात असे सांगितले जात आहे. किंमती वाढण्याचे कारण काय आहे? महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोले म्हणाले की, याचे मुख्य कारण मुसळधार पाऊस आणि पूर आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांत एप्रिल-मेमध्ये साठवून ठेवलेले कांदे सडले. मराठवाडा विभागातील बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि लातूर इत्यादीमध्ये ठेवलेले कांदे पूर आणि अतिवृष्टीमुळे खराब झाले. तर नाशिक, अहमदनगर, धुळे, सोलापूर आणि जळगाव येथे ओलावा असल्याने अनेक शेतकऱ्यांचे कांदे सडले. यामुळे किमतीत वाढ झाली आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात नुकसान होते, तेव्हा मागणी आणि पुरवठा यांच्यात अंतर पडते आणि किंमत वाढते. हे वाचा - ‘पीडित मुलीला घरी ठेवून चित्रा वाघ यांनी भाजप आमदाराला ब्लॅकमेल केलं’ विद्या चव्हाणांच्या आरोपावर चित्रा वाघ म्हणाल्या… कांदा वाचवण्याचा प्रयत्न पाऊस आणि पुरामुळे शेतकऱ्यांना त्यांचे जुने ठेवलेले कांदे वाचवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. कांदा सडत असल्यानं तो स्वच्छ करून त्याची प्रतवारी लावली जात आहे. अशा परिस्थितीत आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 50-60 रुपयांपर्यंत दर मिळाला नाही तर त्यांचे नुकसान भरून निघणार नाही, असेही दिघोले म्हणाले. कांद्याचे घाऊक दर वाढल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे. कारण कांदे सडल्यामुळे त्यांचे आधीच लाखोंचे नुकसान झाले आहे. राज्यातील विविध बाजार समित्यांमधील ताजे दर असे -
  दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
  14/10/2021 अहमदनगर नं. १ नग 1570 2500 3900 2500
  14/10/2021 अहमदनगर नं. २ नग 1120 1100 2300 2300
  14/10/2021 अहमदनगर नं. ३ नग 750 300 1000 1000
  14/10/2021 अमरावती --- क्विंटल 7 900 3500 1800
  14/10/2021 जळगाव लाल क्विंटल 9 2250 2250 2250
  14/10/2021 कोल्हापूर --- क्विंटल 3229 800 3200 2000
  14/10/2021 मंबई --- क्विंटल 10934 2800 3800 3300
  14/10/2021 नागपूर लोकल क्विंटल 15 1500 2500 2100
  14/10/2021 नागपूर उन्हाळी क्विंटल 10 2400 2600 2500
  14/10/2021 नाशिक उन्हाळी क्विंटल 74285 717 3559 3095
  14/10/2021 पुणे --- क्विंटल 400 2000 3000 2500
  14/10/2021 पुणे लोकल क्विंटल 12093 1567 2600 2083
  14/10/2021 सांगली लोकल क्विंटल 2570 1800 3000 2400
  14/10/2021 सातारा --- क्विंटल 101 2000 3500 2700
  14/10/2021 सातारा लोकल क्विंटल 15 2000 3800 3000
  14/10/2021 सोलापूर लाल क्विंटल 18331 150 3800 1900
  14/10/2021 ठाणे नं. १ क्विंटल 3 2500 3200 2850
  Published by:News18 Desk
  First published: