Home /News /money /

आता ऑनलाईन पद्धतीनं दाखल करा ईपीएफसंबधी तक्रारी, जाणून घ्या संपूर्ण Process

आता ऑनलाईन पद्धतीनं दाखल करा ईपीएफसंबधी तक्रारी, जाणून घ्या संपूर्ण Process

अशा पद्धतीनं फाईल करा EPFO संबंधी तक्रारी

अशा पद्धतीनं फाईल करा EPFO संबंधी तक्रारी

याशिवाय 1800-118-005 या टोल फ्री क्रमांकावर जाऊनही तक्रार नोंदवता येणार आहे. ऑनलाईन तक्रार नोंदवून तुम्ही तुमच्या अडचणी सोडवून घेऊ शकता.

    मुंबई, 16 डिसेंबर: तुमचं कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये खातं असल्यास आणि त्यासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास, त्याबाबत तुम्ही आता ऑनलाईन तक्रार नोंदवू (PF Complaint) शकता. ईपीएफओनं (EPFO) आपल्या सदस्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुविधा सुरू केली आहे. जर एखाद्या ईपीएफ (EPF) खातेधारकाला ईपीएफ काढणं, ईपीएफ खात्याचं हस्तांतरण, केवायसी (KYC) संबंधित कोणतीही तक्रार असेल, तर तो ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणालीद्वारे (Grievances management system) तक्रार नोंदवू शकतो. तक्रार दाखल करण्याचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तुम्ही ईपीएफओच्या @socialepfo या अधिकृत ट्विटर हँडलवर आपली तक्रार सांगू शकता. ईपीएफओने आपल्या ट्विटर अकाउंटवर तक्रार दाखल करण्यासंबंधीची माहिती शेअर केली आहे. ईपीएफओच्या epfigms.gov.in या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन देखील तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय 1800-118-005 या टोल फ्री क्रमांकावर जाऊनही तक्रार नोंदवता येणार आहे. ऑनलाईन तक्रार नोंदवून तुम्ही तुमच्या अडचणी सोडवून घेऊ शकता. कशी दाखल कराल तक्रार ? – सर्वात अगोदर epfigms.gov.in या पोर्टलवर जा. – तक्रार दाखल करण्यासाठी ‘रजिस्टर ग्रीव्हन्स’पर्यायावर क्लिक करा. – त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन वेबपेज ओपन होईल. तिथे तक्रार दाखल करण्याचं स्टेटस निवडा. – पीएफ मेंबर, ईपीएस पेन्शनर, एम्प्लॉयर आणि अन्य असे ते स्टेटस आहेत. - जर तुमच्याकडं यूएएन/पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नसेल तरच ‘अन्य’ हा पर्याय निवडा. – पीएफ अकाउंटसंबंधी तक्रार दाखल करण्यासाठी ‘पीएफ मेंबर’ हे स्टेटस निवडा. – त्याठिकाणी तुमचा यूएएन (UAN) आणि सिक्युरिटी कोड टाकून ‘गेट डिटेल्स’ वर क्लिक करा. – यूएनएनसोबत लिंक मास्क्ड असलेले तुमचे पर्सनल डिटेल्स कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसतील. – त्यानंतर ‘गेट ओटीपी’वर क्लिक करा. – ईपीएफओ डेटाबेसमध्ये रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबर आणि ईमेल आईडीवर तुमचा वन टाईम पासवर्ड पाठवला जाईल. – तो ओटीपी (OTP) एंटर केल्यानंतर व्हेरिफाय होईल. त्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमच्या पर्सनल डिटेल्स मागितले जातील. – पर्सनल डिटेल्स भरल्यानंतर तक्रार दाखल करायची आहे त्या पीएफ नंबरवर क्लिक करा. – आता तुम्हाला स्क्रीनवर एक पॉप-अप दिसेल. त्यानंतर तुमच्या तक्रारीशी संबंधित रेडिओ बटन निवडा. – ग्रीव्हन्स कॅटेगरी सिलेक्ट करून आपली तक्रार नोंदवा. – जर तुमच्याकडे तक्रारीशी संबंधित काही कागदपत्रे असतील तर ती अपलोड करा. – तक्रार दाखल केल्यानंतर ‘अॅड’ (Add) आणि 'सबमिट' (Submit) या बटनांवर क्लिक करा. – तुमची तक्रार नोंदणी पूर्ण झाली. – तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आणि मोबाईल नंबरवर कंप्लिट रजिस्ट्रेशन नंबर (Complaint registration number) मिळेल. SBI च्या ग्राहकांना धक्का;आता कर्ज घेणं महागणार, बघा किती वाढले व्याजदर आपल्या तक्रारीचं स्टेटस चेक करा ईपीएफओकडं तक्रार नोंदवल्यानंतर तुम्ही त्याची स्थितीदेखील जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या epfigms.gov.in या पोर्टलवर लॉग इन करावं लागेल. तिथे 'view status' हा पर्याय निवडा. नंतर तक्रार नोंदणी क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा ईमेल आयडी आणि सिक्युरिटी कोड टाका. तुम्हाला लगेच कॉम्प्युटर स्क्रीनवर तुमच्या तक्रारीची स्थिती दिसेल. तुमच्या तक्रारीवर ईपीएफओचं कोणतं प्रादेशिक कार्यालय आणि कोणता अधिकारी काम करत आहे हेदेखील त्या ठिकाणी दिसेल. प्रादेशिक EPFO कार्यालयाशी संपर्क साधायचा असल्यास, तेथील ईमेल अॅड्रेस आणि फोन नंबरही स्क्रीनवर दिसेल. जर तुम्हाला पीएफ संबधीत काही तक्रार असेल तर वरती दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही तक्रार दाखल करू शकता.
    First published:

    Tags: Complaint, Epfo news, Money

    पुढील बातम्या