जाहिरात
मराठी बातम्या / मनी / आता तुम्ही घरबसल्या तुमच्या सोन्यावर भाडे मिळवू शकता; संपूर्ण प्रक्रिया आणि जोखीम पाहा

आता तुम्ही घरबसल्या तुमच्या सोन्यावर भाडे मिळवू शकता; संपूर्ण प्रक्रिया आणि जोखीम पाहा

आता सोने भाड्याने देऊन पैसे कमवण्याची संधी आली आहे.

आता सोने भाड्याने देऊन पैसे कमवण्याची संधी आली आहे.

आता सोने भाड्याने देऊन पैसे कमवण्याची संधी आली आहे. मात्र, त्यातील धोके समजून निर्णय घ्यायला हवा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 ऑक्टोबर : प्रॉपर्टी भाड्याने देऊन जसे पैसे मिळवता येतात तसेच सोनेही भाड्याने देता येते. ऑनलाइन डिजिटल गोल्ड प्लॅटफॉर्म सेफगोल्डने गेन्स नावाची सेवा सुरू केली आहे. याद्वारे ग्राहकांना त्यांचे डिजिटल सोने भाड्याने देऊन काही परतावा मिळू शकतो. ग्राहकांच्या डिजिटल वॉलेटमधून सोने घेऊन ते लहान ज्वेलर्सना भाडेतत्त्वावर दिले जाते. डिजिटल सोने भाड्याने देण्याची प्रक्रिया काय आहे? त्याच्याशी संबंधित जोखीम काय आहेत ते समजून घेऊया. सेफगोल्डच्या मते, “गेन्स हे पीअर-टू-पीअर कर्ज आहे, जेथे ग्राहक स्वत: ज्वेलर्स आणि लीजचा कालावधी निवडू शकतो. ज्वेलर्सने दिलेले उत्पन्न हे ग्राहकाने निवडलेल्या कालावधीवर आधारित असेल. सेफगोल्डच्या वेबसाईटवर सर्व एमएसएमई ज्वेलर्सची केवायसी पडताळणी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्म संस्थापक आणि एमडी गौरव माथूर यांच्या मते, या योजनेअंतर्गत, एखादी व्यक्ती किमान 0.5 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 20 ग्रॅम डिजिटल सोने भाडेतत्त्वावर देऊ शकते. 30 दिवसांपासून 364 दिवसांपर्यंत लीज देता येते. बहुतेक लीज 90 ते 180 दिवसांच्या दरम्यान आहेत. क्लायंट वार्षिक 3-6% उत्पन्नाची अपेक्षा करू शकतो. उत्पन्नाची गणना दररोज केली जाते. ग्राहकाच्या डिजिटल गोल्ड खात्यात मासिक आधारावर खात्यात पैसे येतात. कमावलेले उत्पन्न सोन्याच्या स्वरूपात असते. त्यामुळे लीज संपल्यानंतर मूळ सोने आणि सोन्याच्या स्वरूपात मिळालेले उत्पन्न ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. समजा एखाद्या ग्राहकाने ज्वेलर्सला 10 ग्रॅम सोने तीन महिन्यांसाठी वार्षिक 3% उत्पन्नावर भाड्याने दिले. तर ग्राहकाला 75 मिलीग्रॅम सोने लीज रेंटल इन्कम म्हणून 3 महिन्यांत मिळेल. वाचा - Dhanteras 2022 : सोन्याच्या खरेदीसाठी जळगावात मोठी झुंबड, सुवर्णनगरी गजबजली यात काय धोका आहे? SafeGold वेबसाइट डिजिटल गोल्ड लीजशी संबंधित पाच धोके पाहा 1. सेफगोल्ड म्हणते की डिजिटल गोल्ड लीजिंग हे एक अनियंत्रित उत्पादन आहे. 2. भाडेपट्टीचा कालावधी संपण्यापूर्वी त्याची विक्री करू शकत नाही. म्हणजेच त्यात लिक्वीडिटीचा धोका असतो. 3. भाडेपट्टीची मुदत संपल्यानंतर ज्वेलर्सने सोने परत न केल्यास नुकसान होऊ शकते. 4. लिक्वीडिटीच्या धोक्याव्यतिरिक्त, किंमतीचा धोका देखील आहे. 5. सेफगोल्ड भांडवल किंवा परताव्याच्या संरक्षणाची कोणतीही हमी देत ​​नाही.

News18लोकमत
News18लोकमत

सोने भाड्याने द्यावे का? जर एखाद्याला त्यात असलेल्या जोखमींची पूर्ण माहिती असेल आणि जोखीम घेण्याची तयारी असेल तर काही परतावा मिळवण्याचा लीजिंग हा एक चांगला मार्ग असू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला धोका नको नसेल तर, जमा केलेले सोने डिजिटल खात्यातच ठेवणे चांगले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात