मुंबई, 12 ऑक्टोबर: आजच्या काळात आपला मोबाईल क्रमांक बँक खात्याशी नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आपल्या बँक खात्याशी संबंधित छोट्या-मोठ्या गोष्टींचं अपडेट्स ठेवता येतात. परंतु काहीवेळा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरमध्ये काही समस्या येते किंवा तो काही कारणाने बंद होतो. या परिस्थितीत आपण तो त्वरित बदलला पाहिजे. कारण आजकाल बनावट मोबाईल नंबरद्वारे फसवणूक केली जात आहे. तुमचा नोंदणीकृत क्रमांक बदलण्यासाठी अनेक प्रक्रिया आहेत, ज्या तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता. जसे की देशातील सर्वात मोठी बँक SBI बद्दल बोलायचं झाल्यास ते जुन्या आणि नवीन मोबाईल नंबरद्वारे ATMच्या मदतीनं तसेच नेट बँकिंगद्वारे नंबर बदलण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रत्येक बँकेत जवळपास अशीच पद्धत आहे. घरबसल्या ‘या’ प्रकारे मोबाईल नंबर बदलता येतो- » जर तुमचं नेट बँकिंग खातं असेल तर तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून बँक खात्याचा मोबाईल नंबर बदलू शकता. » जर आपण SBI बद्दल बोललो तर सर्वप्रथम तुम्हाला बँकेच्या www.onlinesbi.com या नेट बँकिंग वेबसाइटवर जावं लागेल. यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं खातं लॉग इन कराल, तेव्हा तुम्हाला येथे प्रोफाइलवर क्लिक करावं लागेल. » त्यानंतर Personal Details वर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोफाइल पासवर्ड टाकावा लागेल. » तो सबमिट केल्यावर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि जुना नंबर दिसेल ज्यामध्ये मोबाईल नंबर बदलण्याचा पर्याय देखील दिसेल.
> या सूचनांचे पालन करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलावा लागेल.
हेही वाचा: PM Swanidhi Yojana: व्यवसायासाठी हमीशिवाय मिळतं कर्ज, ‘ही’ आहे सरकारची खास योजना OTP द्वारे पडताळणी- » जर तुमच्याकडे नवीन आणि जुने दोन्ही मोबाईल नंबर असतील तर तुम्ही दोन्ही मोबाईल नंबरवर By OTP चा पर्याय निवडा आणि Proceed वर क्लिक करा. » ज्या खात्यासाठी तुमच्याकडे डेबिट कार्ड आहे ते खाते निवडा. » खात्याशी लिंक केलेल्या सर्व निष्क्रिय आणि सक्रिय एटीएम कार्डचे तपशील दर्शविणारे एक पृष्ठ उघडेल. येथे सध्या सक्रिय असलेले एटीएम कार्ड निवडून पुष्टी करा. » पुढील स्क्रीनवर निवडलेल्या एटीएम कार्डचा क्रमांक दिसेल. टेक्स्ट बॉक्समध्ये दिलेला तपशील भरा आणि Proceed वर क्लिक करा. » जुन्या आणि नवीन दोन्ही नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. » यानंतर, दोन्ही मोबाईल नंबरवरून चार तासांच्या आत ACTIVATE <8 अंकी OTP> <13 अंकी संदर्भ क्रमांक> 567676 वर एसएमएस करा.
> नवीन मोबाईल क्रमांक सक्रिय होईल.
बँकेत जाऊनही मोबाईल नंबर बदलता येतो- जर तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत नसाल तर तुम्ही बँकेला भेट देऊन तुमचा मोबाईल नंबर बदलू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन मोबाईल नंबर बदलण्याचा फॉर्म भरावा लागेल. याशिवाय तुम्हाला तुमच्या पासबुक आणि आधार कार्डची फोटोकॉपी द्यावी लागेल. यानंतर बँक तुमचा मोबाईल बदलेल.