मुंबई : जागतिक स्तरावर मंदीचे संकेत असताना RBI ने व्याजदारत ०.५० टक्के वाढ करून मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे गृहकर्जासह इतर कर्जही महाग होणार आहेत. EMI वाढणार आहे. आता कार लोनसोबत घरातला स्वयंपाकही करणं महागणार आहे. आधीच भाज्यांचे भाव कडाडले असताना आता गॅसही महाग होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक गॅसच्या किमतींचा आज आढावा घेतला जात आहे. दर 6 महिन्यांनी किमतींचा आढावा घेतला जातो. -नॅचरल गॅसच्या किमती 35%-40% ने वाढण्याची शक्यता आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसच्या किंमती जरी कमी असल्या तरी त्या वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात गॅसच्या किंमती २० ते २५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम CNG आणि PNG गॅसवर होऊ शकतो. या दोघांच्या किंमती वाढतील. CNG वाढला तर रिक्षा, कारपासून अनेक गोष्टी महागतील. एवढंच नाही तर ट्रान्सपोर्ट महागलं तर भाजीपाला महाग होईल. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे.
खत, पॉवर आणि सिरॅमिक कंपन्यांसाठी नकारात्मक परिणाम होऊ शकतो. येत्या काळात आणखी महागाई वाढणार आहे. सणासुदीला खिसा आणखी रिकामा होऊ शकतो. त्यामुळे खर्च करताना जरा जपूनच करा.