मराठी बातम्या /बातम्या /मनी /

म्युच्युअल फंडाची नवीन योजना, अवघ्या 100 रुपयांपासून सुरू करा; 17 डिसेंबरपर्यंत संधी

म्युच्युअल फंडाची नवीन योजना, अवघ्या 100 रुपयांपासून सुरू करा; 17 डिसेंबरपर्यंत संधी

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या NFO तपशीलानुसार, हा मिडकॅप 150 इंडेक्स फंड दीर्घकालीन भांडवली वाढीच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी चांगली योजना आहे. याशिवाय, इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक पर्याय शोधत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली योजना आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 7 डिसेंबर : म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) नवीन योजनेत गुंतवणूक करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने (ICICI Prudential Mutual Fund) मिडकॅप 150 इंडेक्स फंड सुरू केला आहे. या NFO (New Fund Offer) चे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यामध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. याचं सबस्क्रिप्शन17 डिसेंबर 2021 पर्यंत खुलं आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करण्याची संधी देखील आहे. झी बिझनेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

ICICI प्रुडेंशियल मिडकॅप 150 इंडेक्स फंडाचा बेंचमार्क मिडकॅप 150 हा TRI (Total Return Index) आहे. हा ओपन एंडेड टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड आहे. याचा अर्थ NFO नंतर, गुंतवणूकदार कधीही नवीन गुंतवणूक करू शकतील किंवा ज्यांनी आधीच गुंतवणूक केली आहे ते कधीही त्यातून पैसे काढू शकतील. ICICI म्युच्युअल फंड या योजनेत टॉप 10 सेक्टर्सचा समावेश करेल. यामध्ये financial services, consumer goods, automobile, IT, chemical, pharma, oil and gas, power and consumer services असतील.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या NFO तपशीलानुसार, हा मिडकॅप 150 इंडेक्स फंड दीर्घकालीन भांडवली वाढीच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी चांगली योजना आहे. याशिवाय, इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक पर्याय शोधत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली योजना आहे. या योजनेत एक्झिट लोड नाही. तुम्ही SIP द्वारे ICICI Pru च्या या योजनेत देखील गुंतवणूक करू शकता. या डेली, वीकली, फोर्टनाईटली आणि मंथली SIP रक्कम किमान 100 आहे. यासाठी किमान 6 हप्ते भरावे लागतील.

NFO म्हणजे काय?

जेव्हा म्युच्युअल फंड कंपन्या नवीन योजना सुरू करतात तेव्हा ते नवीन फंड ऑफर म्हणजेच NFO जारी करतात. यामध्ये, कंपनी आपल्या योजनेची थीम सांगते आणि त्यांच्या नवीन योजनेचा बेंचमार्क काय असेल हे देखील सांगते. एकदा NFO बंद झाल्यानंतर, त्या योजनेची नियमित एनएव्ही नंतर जारी करणे सुरू होते. ओपन एंडेड असलेल्या योजनेत गुंतवणूकदार कधीही नवीन गुंतवणूक करू शकतात किंवा जुने गुंतवणूकदार बाहेर पडू शकतात.

जेव्हा एखादी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी नवीन फंड लॉन्च करते तेव्हा तो काही दिवसांसाठीच खुला असतो. फंड पोर्टफोलिओसाठी शेअर्स खरेदी करणे आणि त्याद्वारे पैसे उभे करणे हा त्याचा उद्देश आहे. एक प्रकारे नवीन फंड सुरू करण्यासाठी पैसे उभे केले जातात. या संपूर्ण प्रक्रियेला न्यू फंड ऑफर म्हणतात.

First published:

Tags: Investment, Money, Mutual Funds