Home /News /money /

महिन्याच्या किमान गुंतवणूकीत मिळतील तब्बल 35 लाख रुपये; जाणून घ्या Post Office ची नवी योजना

महिन्याच्या किमान गुंतवणूकीत मिळतील तब्बल 35 लाख रुपये; जाणून घ्या Post Office ची नवी योजना

गुंतवणुकीचे ( Investment and Return) अनेक पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेक योजनांवर ( schemes) आकर्षक रिटर्न ( attractive returns) मिळण्याचा दावा करण्यात येतो. त्यांपैकी काहींमध्ये जोखीमसुद्धा असते. अनेक गुंतवणूकदार फायदा ( low profit) कमी असला, तरी गुंतवणूक ( safe investment) सुरक्षित असलेल्या योजनांना प्राधान्य देतात. कारण त्यामध्ये धोका कमी असतो. तुम्हीही कमी जोखीम असणाऱ्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना (Post Office Scheme) तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

पुढे वाचा ...
     मुंबई, 24 नोव्हेंबर-   गुंतवणुकीचे ( Investment and Return) अनेक पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेक योजनांवर ( schemes) आकर्षक रिटर्न ( attractive returns) मिळण्याचा दावा करण्यात येतो. त्यांपैकी काहींमध्ये जोखीमसुद्धा असते. अनेक गुंतवणूकदार फायदा ( low profit) कमी असला, तरी गुंतवणूक ( safe investment) सुरक्षित असलेल्या योजनांना प्राधान्य देतात. कारण त्यामध्ये धोका कमी असतो. तुम्हीही कमी जोखीम असणाऱ्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना (Post Office Scheme) तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. भारतीय पोस्ट (Indian Post) विभागाची ग्राम सुरक्षा योजना ( Gram Suraksha Yojana) हा गुंतवणुकीचा असाच चांगला पर्याय आहे. त्यामध्ये कमी जोखमीमध्ये चांगले रिटर्न्स मिळू शकतात. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत बोनससह विमा रक्कम वयाच्या 80व्या वर्षी किंवा संबंधित ग्राहकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कायदेशीर वारसाला किंवा त्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला मिळते. योजनेच्या नियम व अटी- 19 ते 55 वयोगटातला कोणताही भारतीय नागरिक ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत किमान 10,000 ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेचा प्रीमियम भरण्यासाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक अशी सुविधा घेता येते. ग्राहकाला प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधीदेखील दिला जातो. पॉलिसी सुरू असताना हप्ते थकल्यास ग्राहक थकित प्रीमियम भरून पॉलिसी पुन्हा सुरू करू शकतो. कर्ज घेण्याची सुविधा- या योजनेअंतर्गत कर्जसुविधेचा सुद्धा लाभ घेता येतो; मात्र हा लाभ पॉलिसी खरेदी केल्यानंतर 4 वर्षांनी मिळू शकतो. तीन वर्षांनंतर सरेंडर करता येते पॉलिसी ग्राहक 3 वर्षांनंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो; मात्र अशा वेळी त्याला योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. पॉलिसीचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय पोस्ट विभागाने देऊ केलेला बोनस. प्रति 1000 रुपयांना 65 रुपये प्रति वर्ष बोनस या योजनेअंतर्गत देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर मिळणारे फायदे- एखाद्याने 19 वर्षांच्या वयात 10 लाखांची ग्रामसुरक्षा पॉलिसी घेतली, तर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल. 60 वर्षांसाठी मॅच्युरिटी लाभ 34.60 लाख रुपये मिळेल. येथे मिळेल माहिती- या योजनेची माहिती मिळवण्यासाठी, तसंच योजना घेतल्यानंतर नॉमिनी नाव किंवा ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर यांसारखे तपशील अपडेट करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी ग्राहक 1800 180 5232/155232 या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर किंवा www.postallifeinsurance.gov.in या अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधू शकतात.
    First published:

    Tags: Money, Post office money

    पुढील बातम्या