जाहिरात
मराठी बातम्या / मनी / उन्हाळ्यात चिल्ड बिअरच्या किमती देणार चटके! तब्बल इतकी होणार दरवाढ

उन्हाळ्यात चिल्ड बिअरच्या किमती देणार चटके! तब्बल इतकी होणार दरवाढ

उन्हाळ्यात चिल्ड बिअरच्या किमती देणार चटके! तब्बल इतकी होणार दरवाढ

शिया-युक्रेन युद्धाचे जगावर विविध प्रकारे पडसाद पडत आहेत. याच युद्धामुळे आता देशातील बिअरच्या किंमती (Beer Price Hike) वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात चिल्ड बिअर पिण्याचा तुमचा बेत थोडा महाग पडू शकतो.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

     मुंबई, 28 एप्रिल-  रशिया-युक्रेन युद्धाचे जगावर विविध प्रकारे पडसाद पडत आहेत. याच युद्धामुळे आता देशातील बिअरच्या किंमती (Beer Price Hike) वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात चिल्ड बिअर पिण्याचा तुमचा बेत थोडा महाग पडू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, बिअर कंपन्या 10 ते 15 टक्के भाववाढ (Beer price) करण्याच्या विचारात आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा थेट परिणाम- रशिया आणि युक्रेन हे जगातील सर्वात मोठ्या बार्ली (Barley) आणि गहू निर्यात करणाऱ्या देशांपैकी आहेत. जागतिक बाजारपेठेत दाखल होणाऱ्या गव्हापैकी 30 टक्के गहू हा या दोन देशांमधून येतो. तर, जागतिक बाजारपेठेतील 18 टक्के बार्ली ही रशिया आणि युक्रेनमधून (Russia Ukraine Crisis) निर्यात होते. मात्र, सध्या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही निर्यात पूर्णपणे ठप्प आहे. भारतात बार्लीची किंमत वाढली- बिअर बनवण्यासाठी बार्लीचा (Barley price hike) अधिक प्रमाणात वापर होतो. देशात बार्लीचं सर्वाधिक उत्पादन राजस्थानमध्ये घेतलं जातं. 2021 या आर्थिक वर्षात देशभरात 16.7 मेट्रिक टन बार्लीचं उत्पादन झालं होतं. 2020च्या तुलनेत हे 1.72 लाख टन कमी होतं. कमी उत्पादन, वाढलेला ट्रान्सपोर्ट खर्च अशा विविध गोष्टींमुळे बार्ली महाग झाली आहे. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. देशातील बिअर मार्केट तेजीत- इंडियन काउन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स या संस्थेने दिलेल्या एका अहवालानुसार, देशातील मद्यपान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 2005 मध्ये ही संख्या 21.9 कोटी होती, तर 2023 पर्यंत ही संख्या 38.6 कोटी होण्याचा अंदाज या संस्थेने वर्तवला आहे. यामुळेच देशातील बिअर मार्केटमध्येही (Beer Market in India) तेजी येणार आहे. मार्केट रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये देशातील बिअर मार्केट 371 अब्ज रुपये एवढं होतं. हेच 2026 पर्यंत 662 अब्ज रुपये होण्याचा अंदाज आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2015-16 आणि 2018-19 दरम्यान देशातील अल्कोहोलिक ड्रिंक्सचे उत्पादन तब्बल 23.8 टक्क्यांनी वाढले आहे. हा उद्योग (India Beer Market) सुमारे 15 लाख लोकांसाठी रोजगार निर्माण करतो. 2019 मध्ये बिअरच्या विक्रीतून 48.8 अब्ज डॉलर्सची कमाई झाली होती.

    News18

    विविध गोष्टींचा परिणाम मात्र सध्या, बार्लीची वाढलेली किंमत, ट्रान्सपोर्ट आणि पॅकेजिंगचा वाढलेला खर्च, या सगळ्या गोष्टींमुळे बिअर उत्पादक कंपन्यांचे मार्जिन कमी होण्याची भीती आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी बिअर कंपन्या दरवाढ (Beer price may increase) करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता कंपन्या दरवाढ करतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: beer , money
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात