मराठी बातम्या /बातम्या /मनी /महागाईचा फटका! दुधासोबत डेअरी प्रॉडक्टसच्या किंमतीत होणार वाढ?

महागाईचा फटका! दुधासोबत डेअरी प्रॉडक्टसच्या किंमतीत होणार वाढ?

गेल्या काही महिन्यांपासून इंधन, खाद्यतेल आणि अन्नधान्याच्या किमतींत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महिन्याच्या खर्चाचं नियोजन करताना महिलावर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मर्यादित उत्पन्न आणि वाढती महागाई यामुळे कुटुंबांचं महिन्याचं आर्थिक नियोजन पुरतं विस्कळीत झालं आहे.

पुढे वाचा ...

  /मुंबई, 10 जून-  गेल्या काही महिन्यांपासून इंधन, खाद्यतेल आणि अन्नधान्याच्या किमतींत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महिन्याच्या खर्चाचं नियोजन करताना महिलावर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मर्यादित उत्पन्न आणि वाढती महागाई यामुळे कुटुंबांचं महिन्याचं आर्थिक नियोजन पुरतं विस्कळीत झालं आहे. त्यातच आता दुधाचे दर (Milk Rate) वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उष्णतेमुळं दूध उत्पादन घटलं असून, मागणी वाढल्यामुळे दुधाच्या दरात वाढ होऊ शकते, असं मत जाणकार व्यक्त करत आहेत.

  देशातल्या महागाईचा परिणाम आता दुधाच्या दरावरही होण्याची शक्यता आहे. डेअरी कंपन्यांकडून लवकरच दुधाच्या दरात वाढ (Milk Price Hike) केली जाऊ शकते. `अलीकडे जागतिक स्तरावर स्किम्ड मिल्क पावडर (Skimmed Milk Powder) आणि पशुखाद्याचे (Animal feed) दर वाढले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत दुधाचे दर वाढू शकतात,` असं आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी शुक्रवारी (10 जून) सांगितलं.

  जाणकारांच्या म्हणण्यानुसार, `जवळपास सर्व डेअरीज दुधाचे दर 5 ते 8 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. दुधाचे वाढते दर हा चिंतेचा विषय आहे. सर्व डेअरीज आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत किमती वाढवतील, अशी अपेक्षा आहे.`

  कमी उत्पादन आणि वाढती मागणी हे आहे कारण

  विश्लेषकांनी सांगितलं, की `गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुरू झाल्याने दुधाची मागणी झपाट्यानं वाढली आहे. त्यामुळे दुधाचे दर वाढले आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत झालेली वाढ आणि उष्णतेमुळे दुधाचं घटलेलं उत्पादन या घटकांचाही परिणाम दरावर झालेला आहे. परिणामी घाऊक दुधाचे दर दर वर्षी वाढतच आहेत. उदाहरणार्थ, अखिल भारतीय पातळीवर जूनमध्ये दुधाचे दर 5.8 टक्क्यांनी वाढले होते. दक्षिण भारतात दुधाचे दर वर्षाला 3.4 टक्के वाढले आहेत.`

  (हे वाचा:ICICI बँक ग्राहकांची चिंता वाढली; बँकेकडून व्याजदरात वाढ, EMI जास्त भरावा लागणार)

  निर्यात वाढल्याने दूध महागणार

  दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढल्याने जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. डेअरी कंपन्यांना कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचाही सामना करावा लागत आहे. उदाहरणार्थ, जागतिक स्किम्ड मिल्क पावडरच्या किमती गेल्या 12 महिन्यांत सातत्याने वाढल्या आहेत. ज्या इयर-ऑन-इयर 26.3 टक्के आणि जून महिन्यात महिना-दर-महिना 3 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आकर्षक निर्यातसंधी (Export) भारतीय दूध उद्योगातल्या मागणी (Demand) आणि पुरवठ्याचं (Supply) समीकरण बिघडवू शकतात, असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. एकूणच दुधाच्या दरात वाढ झाली तर महागाईचे चटके अजूनच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  First published:
  top videos

   Tags: Inflation, Lifestyle, Money, Price hike