जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Business Idea : हायवे जवळ जमीन असेल तर सुरू करा हे व्यवसाय, लाखो नाही करोडो कमवाल!

Business Idea : हायवे जवळ जमीन असेल तर सुरू करा हे व्यवसाय, लाखो नाही करोडो कमवाल!

हायवे जवळ जमीन असेल तर सुरू करा हे व्यवसाय

हायवे जवळ जमीन असेल तर सुरू करा हे व्यवसाय

गेल्या काही वर्षांमध्ये स्टार्टअप बिझनेसमुळे व्यवसायाला नवी दिशा मिळाली आहे. नवे उद्योजक तयार होत आहेत. सध्या सगळ्याच गोष्टींमध्ये विकासाचं वारं वाहत आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 7 जुलै : गेल्या काही वर्षांमध्ये स्टार्टअप बिझनेसमुळे व्यवसायाला नवी दिशा मिळाली आहे. नवे उद्योजक तयार होत आहेत. सध्या सगळ्याच गोष्टींमध्ये विकासाचं वारं वाहत आहे. मोठमोठी शहरं असोत किंवा छोटी गावं, प्रत्येक ठिकाणाला जोडणारे रस्ते तयार होत आहेत. या महामार्गांच्या बरोबरच तिथल्या गावांचा व आजूबाजूच्या परिसराचा विकास होतो आहे. तुमच्याकडे महामार्गाजवळची एखादी जमीन असेल, तर तुम्ही उत्तम व्यवसाय करू शकाल. भविष्यात यातून कोट्यवधींची संपत्ती उभी करता येईल. भारतात रस्त्यांचं जाळ विकसित होतंय. सरकार रस्त्यांची निर्मिती आणि विकासाबाबत खूपच सजग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं रस्ते बांधण्यात बरीच प्रगती केलीय. भारतात 200पेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग आहेत. या महामार्गांची एकूण लांबी अंदाजे 70 हजार किलोमीटर इतकी आहे. देशातलं 40 टक्के ट्रॅफिक कमी करण्यासाठी याची मदत होते. देशातल्या रस्त्यांचं जाळं इतकं मोठं आहे, की चीननंतर भारताचाच रस्त्यांच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. या महामार्गांवर सतत वाहनांची वर्दळ असते. सगळ्या प्रकारच्या व्यक्ती त्यावरून प्रवास करतात. या महामार्गांच्या जवळ एखादा व्यवसाय सुरू करून उत्पन्न कमावता येऊ शकतं. आतापर्यंत अनेकांनी महामार्गांच्या जवळ ढाबे, रेस्टॉरंट्स, लॉज, गॅरेज काढून त्यातून पैसे मिळवले आहेत. तुम्हालाही हायवेजवळच्या जमिनीचा उपयोग बिझनेससाठी करता येईल; मात्र त्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. - तुम्ही किती पैसे गुंतवण्याचा विचार करत आहात? - तुमच्याकडे महामार्गाजवळ किती जमीन आहे? - तुमच्याकडे व्यवसायाचा काही अनुभव आहे का? - व्यवसायात नुकसान झाल्यास किती काळ सहन करू शकता? स्वतःला या प्रश्नांची उत्तरं विचारा. त्यानंतरच व्यवसायाची सुरुवात करा. तुमचं बजेट थोडंच असेल, तर घाबरून जाऊ नका. तुम्ही कमी बजेटमध्येही व्यवसाय करू शकता. तुम्ही महामार्गाजवळ एखाद्या गावात राहत असाल आणि तिथेच तुमची जागा असेल, तर तुम्ही फळं आणि भाज्या विकून पैसे कमावू शकता. तुमची स्वतःची शेती नसली, तरी दुसऱ्यांच्या शेतातून माल विकत घेऊन तुम्ही हायवेवर जाऊन विकू शकता. यातून चांगली कमाई होऊ शकते. त्याशिवाय एखादं गॅरेजही उघडू शकता. तुम्ही जास्त पैसे गुंतवू शकणार असाल, तर फूड प्लाझा, ढाबा, वेअरहाउस, एलएनजी स्टेशन, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन किंवा पेट्रोल पंप काढू शकता. यासाठी अनेक कंपन्या आता पुढे येत आहेत. पेट्रोल पंप उघडण्यासाठी कोणत्याही मुख्य रस्त्याजवळ तुमच्या नावावर जमीन असावी लागते. तुम्ही एक डिस्पेन्सिंग युनिट उघडणार असाल, तर त्याला 800 चौरस मीटर आणि दोन डिस्पेन्सिंग युनिट्ससाठी 1200 चौरस मीटर इतकी जमीन गरजेची असते. तसंच ती जमीन कोणत्याही कायदेशीर वादात अडकलेली नसावी. सध्या महामार्गांचं विस्तारीकरण होत आहे, नवे रस्ते तयार होत आहेत. त्यामुळे महामार्गाजवळ जमीन असल्यास तिचा व्यवसायासाठी उत्तम वापर करता येऊ शकेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात