Home /News /money /

NFO Investment: केवळ 5000 रुपये गुंतवून मोठा नफा कमावण्याची संधी, कुठे कराल गुंतवणूक?

NFO Investment: केवळ 5000 रुपये गुंतवून मोठा नफा कमावण्याची संधी, कुठे कराल गुंतवणूक?

Mirae Asset Mutual Fund चा NFO हा एक ओपन-एंडेड टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड आहे. यामध्ये, किमान गुंतवणुकीची रक्कम 5,000 रुपये आहे, त्यानंतर तुम्ही एक रुपयांच्या पटीत गुंतवणूक वाढवू शकता.

    मुंबई, 28 मार्च : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक (Mutual Fund Investment) बर्‍याच प्रमाणात सुरक्षित मानली जाते कारण दीर्घकालीन गुंतवणूक आपल्याला येथे चांगला परतावा देते. देशातील आघाडीचे फंड हाऊस मिरे अॅसेट म्यूचुअल फंड (Mirae Asset Mutual Fund) च्या न्यू फंड ऑफरमध्ये (NFO) गुंतवणूक करण्याची संधी आहे. Mirae Asset Mutual Fund ने 'Mire Asset Nifty SDL जून 2027 Index Fund' हा नवीन फंड लॉन्च केला आहे. हा NFO 25 मार्च रोजी उघडला आहे आणि 29 मार्चपर्यंत गुंतवणूक करता येईल. यामध्ये किमान 5 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत. Mirae Asset Mutual Fund चा NFO हा एक ओपन-एंडेड टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड आहे. यामध्ये, किमान गुंतवणुकीची रक्कम 5,000 रुपये आहे, त्यानंतर तुम्ही एक रुपयांच्या पटीत गुंतवणूक वाढवू शकता. Mirae Asset Investment Managers (India) Pvt Ltd, संचालक आणि CEO स्वरूप मोहंती यांच्या मते, Mirae Asset Nifty SDL जून 2027 इंडेक्स फंड हा कमी क्रेडिट जोखीम असलेल्या मजबूत डेट पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांगला गुंतवणूक पर्याय असू शकतो. यात कधीही गुंतवणूक किंवा फंड काढण्याची फ्लेक्सिबिलीटी देखील आहे. याचाच अर्थ असा की या फंडात गुंतवणूक करण्यासाठी कोणताही लॉक-इन कालावधी नाही. गुंतवणूकदार फंडच्या संपूर्ण लाईफ सायकलमध्ये कधीही सबस्क्राईब किंवा रिडीम करू शकता. या NFO चे पैसे स्टेट डेव्हलपमेंट लोन्स (SDL) मध्ये गुंतवले जातील. याचा अर्थ क्रेडिट जोखीम नगण्य आहे. Uma Exports IPO आजपासून गुंतवणुकीसाठी ओपन; प्राईज बँड, इश्यू साईज, काय करते कंपनी? वाचा सविस्तर न्यू फंड ऑफर (NFO) काय आहे? जेव्हा म्युच्युअल फंड हाऊस पहिल्यांदा म्युच्युअल फंड मार्केटमध्ये फंड लाँच करते तेव्हा त्याला न्यू फंड ऑफर (NFO) म्हणतात. बाजारातून पैसे उभे करण्याच्या उद्देशाने नवीन फंड ऑफर आणली जाते. नवीन फंड ऑफर बाजारात IPO प्रमाणे सुरू केली जाते. हे IPO सारखे वाटते पण तसे नाही. PVR-INOX शेअर्समध्ये विलिनीकरणानंतर तेजी, दोन्ही शेअरच्या किंमती रेकॉर्ड हायवर याचे ओपन एंडेड फंड (Open Ended Mutual Fund) आणि क्लोज एंडेड फंड (Close Ended Fund) असे दोन प्रकार आहेत. गुंतवणूकदार ओपन-एंडेड म्युच्युअल फंडात पैसे गुंतवू शकतात आणि ते कधीही काढू शकतात. क्लोज-एंडेड म्युच्युअल फंड योजनेत तुम्ही फक्त एनएफओच्या वेळीच पैसे गुंतवू शकता आणि त्यानंतर तुम्ही फक्त मॅच्युरिटीच्या वेळीच पैसे काढू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Mutual Funds

    पुढील बातम्या