Home /News /money /

10-10 रुपयांची नाणी देऊन विकत घेतली सहा लाखांची गाडी, व्यक्तीने असं करण्यामागचं कारणंही सांगितलं

10-10 रुपयांची नाणी देऊन विकत घेतली सहा लाखांची गाडी, व्यक्तीने असं करण्यामागचं कारणंही सांगितलं

वेत्रिवेलने सुमारे महिनाभर 10 रुपयांची नाणी गोळा केली आणि त्यानंतर तो कार घेण्यासाठी शोरूममध्ये पोहोचला. वेत्रिवेलला आधी कार पंसत केली आणि त्यानंतर गाडीची रक्कम नाण्यामध्ये देणार असल्याचे सांगितलं.

    नवी दिल्ली, 20 जून : गाडी घेणे हा प्रत्येकासाठीच अविस्मरणीय क्षण असतो. मात्र कर्नाटकातील कोईम्बतूरमधील एका व्यक्तीच्या गाडी खरेदीची घटना अनेकांच्या लक्षात राहील. कारण या व्यक्तीने सहा लाखांनी गाडी चक्का दहा रुपयांची नाणी देऊन खरेदी केली आहे. याची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल झालेली घटना तामिळनाडूतील धर्मापुरीची आहे. 10 रुपयांच्या नाण्यांनी कार विकत घेतलेल्या व्यक्तीचे नाव वेत्रिवेल असून तो आरूरचा रहिवासी आहे. 10 रुपयांच्या नाण्यांनी भरलेली पोती घेऊन हा व्यक्ती शोरूममध्ये पोहोचला तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांच्यानाही काही सुचत नव्हते. हे करण्यामागचे कारणही वेत्रिवेलने सांगितले. वेत्रिवेल व्यावसायिक असून तो एक शाळा आणि मेडिकल स्टोअर चालवतो. त्याची आई देखील एक लहान दुकान चालवते. त्या व्यक्तीने सांगितले की, जे लोक दुकानात येतात, त्यापैकी बरेच लोक 10 रुपयांची नाणी वापरुन खरेदी करतात. परंतु जेव्हा 10 रुपयांची नाणी ग्राहकांना सुट्टी म्हणून परत केली जातात तेव्हा ते घेण्यास नकार देतात. त्यामुळेच त्याच्याकडे इतकी नाणी जमा झाल्याचे वेत्रिवेल यांनी सांगितले. सरकारच्या SGB स्कीमद्वारे आजपासून स्वस्त सोनं खरेदीची संधी, गुंतवणूक कशी करावी? बँकेकडूनही नाणी बदलून देण्यास नकार वेत्रिवेल यांनी सांगितले की, ते ही नाणी घेऊन बँकेतही गेले होते पण बँकेने ही नाणी मोजण्यासाठी कर्मचारी नसल्याचे सांगून बदली करण्यास नकार दिला. वेत्रिवेलने सांगितले की, त्यांच्या शेजारील अनेक मुले 10 रुपयांच्या नाण्यांसोबत खेळतात. त्यांनी मुलांना नाण्यांशी का खेळता विचारले, त्यावर मुलांनी सांगितले की, त्यांच्या पालकांनी ही नाणी काही उपयोगाची नसल्यामुळे दिली आहेत.  वेत्रिवेल म्हणाले की, असे करून मला दाखवायचे होते की 10 रुपयांची नाणी निरुपयोगी नाहीत. जन धन खातेधारकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारकडून मिळणार मोठा लाभ शोरूम मालकाने आधी नकार दिला वेत्रिवेलने सुमारे महिनाभर 10 रुपयांची नाणी गोळा केली आणि त्यानंतर तो कार घेण्यासाठी शोरूममध्ये पोहोचला. वेत्रिवेलला आधी कार पंसत केली आणि त्यानंतर गाडीची रक्कम नाण्यामध्ये देणार असल्याचे सांगितलं. शोरूम मालकाने आधी नकार दिला पण नंतर तो मान्य झाला. गाड्यांमध्ये नाणी भरून वेत्रिवेल शोरूममध्ये पोहोचला. गाडी खरेदी करण्यासाठी त्यांनी नाण्यांची पोती उघडताच तेथे उपस्थित प्रत्येक कर्मचारी अचंबित झाला.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Car, Money, Rupee

    पुढील बातम्या