मराठी बातम्या /बातम्या /मनी /

वडिलांच्या मृत्यूनंतर कर्जाचं काय होतं? मुलांनी ते फेडणं बंधनकारक?

वडिलांच्या मृत्यूनंतर कर्जाचं काय होतं? मुलांनी ते फेडणं बंधनकारक?

वडिलांच्या मृत्यूनंतर कर्ज कोण फेडणार? कर्जवसुलीचे नियम काय सांगतात जाणून घ्या

मुंबई : काही वेळा एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या घरात प्रॉपर्टीवरून वादविवाद होतात. काही वेळा प्रॉपर्टी नसेल आणि त्या व्यक्तीवर कर्ज आणि बँक लोन असेल तर त्यावरूनही वाद होतात. प्रॉपर्टीचा मुद्दा आसेल तर सहजपणे कोणीही पुढाकार घेतं; पण कर्ज फेडायचं असेल तर मात्र कुटुंबातले अनेक जण हात वर करतात. अनेकदा वडिलांनी घेतलेल्या कर्जाशी आपला संबंध नाही असं मुलं सांगतात; पण त्यामध्ये नियम नेमकं काय सांगतो? वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचं कर्ज मुलांनी फेडणं आवश्यक आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याविषयी माहिती घेऊ या. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचं कर्ज चुकवणं ही मुलांची जबाबदारी आहे (Loan Repayment after Father’s demise) का, याबद्दल कायदा काय सांगतो, हे पाहू या. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचा वारस जो असेल तोच त्यांचं कर्जही फेडेल असं घटनेच्या कलम 52 आणि 53 मध्ये सांगितलं आहे. वारस (Heir) कोण आहे आणि कर्जाचं स्वरूप काय आहे यावरही कर्जाची जबाबदारी आधारित असते. मृत व्यक्तीने मागे पैसा किंवा संपत्ती ठेवली आहे की नाही हा मुद्दा महत्त्वाचा असतो. तसंच मुलांनी त्यांच्या बळावर पैसा कमावला असेल तर परिस्थिती वेगळी असते. वारसा हक्काने मिळालेली संपत्ती असेल, तर त्या वेळी वेगळे नियम लागू होतात. अशा परिस्थितीत संपत्तीचा मालक जो असेल तोच कर्जाची जबाबदारी घेईल असा नियम आहे. म्हणजे एखाद्या कुटुंबातली संपत्ती चार जणांमध्ये विभागली गेली असेल तर कर्जफेडीचं वाटपही त्याच प्रमाणात होतं. त्याशिवाय त्या व्यक्तीवर अन्य कोणती जबाबदारी तर नाही ना, यांसारख्या अन्य गोष्टीही लक्षात घेतल्या जातात. त्यानंतर मग परिस्थिती आणि अन्य कायदे लक्षात घेऊन निर्णय घेतला जातो. त्याशिवाय कर्ज कोणत्या स्वरूपाचं आहे त्यावरही कोण कोणतं कर्ज फेडेल याबद्दल निर्णय घेतला जातो. काही महत्त्वाचे मुद्दे 1. होम लोनच्या (Home Loan) बाबतीत संपत्तीचा जो वारस असेल तो होम लोनची परतफेड करतो. 2. कार लोन (Car Loan) असेल तर कार विकून पैसे फेडले जाऊ शकतात. 3. पर्सनल लोन (Personal Loan) असेल तर बँकेत ज्याचं नाव नॉमिनी म्हणून देण्यात आलं आहे, त्याचीच परतफेडीची जबाबदारी असते. इन्शुरन्स असेल तर त्याबाबत वेगळा निर्णय घेतला जातो. 4. बिझनेस लोन (Buisness Loan) म्हणजे व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज असेल तर संपत्ती किती आहे त्याच्या आधारे कर्ज वसूल केलं जातं. 5. क्रेडिट कार्डच्या (Credit Card) बाबतीतही संपत्तीच्या आधारावर पैसे वसूल केले जातात. हे सर्वसाधारण नियम आहेत. प्रत्येक व्यक्ती आणि परिस्थितीनुसार प्रत्येक वेळी वेगवेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात.
First published:

Tags: Loan, Money, Pay the loan

पुढील बातम्या