मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आर्थिक मंदी येतेय कसं ओळखाल? लिपस्टिक अन् अंडरवेअरच्या खरेदीवर ठेवा लक्ष; तुम्हीही व्हाल तज्ज्ञ

आर्थिक मंदी येतेय कसं ओळखाल? लिपस्टिक अन् अंडरवेअरच्या खरेदीवर ठेवा लक्ष; तुम्हीही व्हाल तज्ज्ञ

लिपस्टिक आणि अंडरवेअरचा आर्थिक मंदीशी काय संबंध?

लिपस्टिक आणि अंडरवेअरचा आर्थिक मंदीशी काय संबंध?

लिपस्टिक (Lipstick and Recession) आणि अंडरवेअर (Underwear and Recession) या गोष्टींवरूनदेखील मंदीचा अचूक अंदाज लावता येतो, असं सांगितलं तर विश्वास बसेल का?

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : सध्या जगभरात आर्थिक मंदीबाबत (Economic Recession) चर्चा सुरू आहे. मंदीची एक मोठी लाट सध्या जगातल्या बलाढ्य देशांमध्ये आली आहे किंवा येण्याची शक्यता आहे. साधारणतः आर्थिक मंदी ओळखण्यासाठी प्रामुख्याने शेअर मार्केट (Share Market), किंवा घरविक्रीचं प्रमाण (Housing Market) किंवा महागड्या वस्तूंची विक्री होण्याचं प्रमाण पाहिलं जातं. शेअर बाजार कोसळणं किंवा घरांची विक्री कमी होणं हे मंदीचे मुख्य संकेत (Signs of Recession) मानले जातात; मात्र तुम्हाला सांगितलं, की लिपस्टिक (Lipstick and Recession) आणि अंडरवेअर (Underwear and Recession) या गोष्टींवरूनदेखील मंदीचा अचूक अंदाज लावता येतो, तर खरं वाटेल? ही गोष्ट ऐकायला कितीही अजब असली, तरी ती खरी आहे. 'TV9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मंदी आल्यावर वाढते लिपस्टिकची विक्री लिपस्टिक विक्रीच्या माध्यमातून आर्थिक मंदीचे संकेत मिळू शकतात ही गोष्ट खरी आहे; मात्र बऱ्याच जणांना असं वाटू शकतं, की लिपस्टिकची विक्री कमी होणं हा मंदीचा संकेत आहे. तुम्हालाही तसं वाटत असेल तर तुम्ही चुकताय. खरं तर लिपस्टिकच्या विक्रीमध्ये वाढ होणे हा आर्थिक मंदी येण्याचा संकेत असतो. लिओनार्ड लॉडर यांनी याबाबत पहिल्यांदा सिद्धांत मांडला होता. तो ‘लिपस्टिक इंडेक्स’ (Lipstick Index) म्हणूनही ओळखला जातो. त्यांच्या सिद्धांतानुसार, अर्थव्यवस्था जेवढी खराब होत जाते, तेवढी लिपस्टिकची विक्री वाढत जाते. हा सिद्धांत (Lipstick Index Theory) वेळोवेळी आलेल्या मंदीदरम्यान खरा ठरल्याचं पाहायला मिळालं आहे. 2001 साली अमेरिकेत आलेल्या महामंदीच्या वेळीदेखील अशाच प्रकारे लिपस्टिकची विक्री वाढली होती. असं का होतं? लिओनार्ड यांनी आपल्या सिद्धांतामध्ये यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, जेव्हा आर्थिक मंदी येते, तेव्हा साधारणपणे इतर महागड्या वस्तूंची विक्री कमी होते. सोबतच, महिलादेखील मेकअपचं इतर महागडं सामान घेणं टाळतात आणि केवळ लिपस्टिक खरेदी (Lipstick Sell during recession) करतात. यामुळेच लिपस्टिकचा खप वाढतो. अशा प्रकारे लिपस्टिक इंडेक्सचा आर्थिक मंदीशी व्यस्त संबंध असतो.

Money Transfer Rules to Abroad: परदेशात पैसे पाठवण्यापूर्वी समजून घ्या हे नियम, नाहीतर याल अडचणीत

अंडरवेअरचा मात्र थेट संबंध ज्याप्रमाणे लिपस्टिक इंडेक्स आहे, त्याचप्रमाणे एक ‘अंडरवेअर इंडेक्स’ही (Underwear Index) आहे. 1970 च्या दशकात एलन ग्रीनस्पॅन यांनी या इंडेक्सचा शोध लावला होता. लिपस्टिकप्रमाणे हा इंडेक्स व्यस्त नसून, मंदीशी थेट संबंधित असतो. म्हणजेच, जेवढी मंदी जास्त, तेवढी अंडरवेअरची विक्री कमी असं साधं गणित या सिद्धांतात (Underwear Index theory) मांडण्यात आलं आहे. आर्थिक मंदी आलेली असताना नागरिक केवळ आवश्यक वस्तूंवर खर्च करण्याचा विचार करतात. त्यामुळे कपड्यांच्या आतमध्ये असलेल्या आणि कुणालाही न दिसणाऱ्या अंडरगार्मेंट्सवर खर्च (Underwear sell during recession) करणं टाळलं जातं. त्यामुळेच अंडरगार्मेंट्सची विक्री झपाट्याने कमी झाल्यास, तो आर्थिक मंदीचा संकेत समजला जातो. कारण तशी महत्त्वाची असूनही ही गोष्ट खरेदी करण्याचं प्रमाण कमी होत आहे, याचाच अर्थ मंदी आली आहे असा होतो. अशा प्रकारे लिपस्टिक आणि अंडरवेअर या साध्या गोष्टींच्या माध्यमातूनदेखील आर्थिक मंदी येणार आहे की नाही याचा अंदाज अचूक बांधला जाऊ शकतो.
First published:

Tags: Economic crisis

पुढील बातम्या