• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच; साठवणूक करावी की विक्री? उत्पादक शेतकऱ्यांसमोर प्रश्न

सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच; साठवणूक करावी की विक्री? उत्पादक शेतकऱ्यांसमोर प्रश्न

क्विंटलचा भाव आता 4 ते 5 हजारापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज असून पीक आताच बाजारात विकावे की काही दिवस साठवूण दर वाढल्यानंतर विकावे याबद्दल संभ्रम आहे.

 • Share this:
  मुंबई, 16 ऑक्टोबर : सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस घसरत आहेत. सोयाबीन (Soyabean) काढणी सुरू असताना दर मात्र पडत (latest soybean rate in Maharashtra) असल्याने राज्यातील शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण आहे. हंगामाच्या सुरूवातीचे दर आणि आताचे दर यामध्ये निम्म्याने फरक पडला आहे. सप्टेंबर महिन्यात जवळपास 11 हजार असलेला क्विंटलचा भाव आता 4 ते 5 हजारापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज असून पीक आताच बाजारात विकावे की काही दिवस साठवूण दर वाढल्यानंतर विकावे याबद्दल संभ्रम आहे. काही कृषी तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी सोयाबीनची (soybean) साठवणूक करण्यापेक्षा सध्याच्या आहे, त्या भावावर विक्री करणे योग्य ठरेल. कारण आता काढणी सुरू असून बाजार समित्यांमधील आवक वाढतच जाणार आहे. मागणी पुरवठ्याच्या सूत्रानुसार आवक वाढल्यानंतर साहजिकच दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आताचा सोयाबीन हा पावसात भिजलेला आहे. त्यामुळं त्याची आणखी साठवणूक करून ते खराब झाल्यास फार मोठे नुकसान होऊ शकते. तर दुसरीकडं आधीच पावसामुळं पीक खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरून निघण्यासाठी चांगल्या दराची अपेक्षा होती. मात्र, दर वाढत नसून दिवसेंदिवस दरात घट होत आहे. सध्याची बाजारातील स्थिती - सणासुदीच्या काळात महागाई कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारनं खाद्यतेलाचे आयातशुल्क कमी केले आहे. दुसरीकडे तेलबियांच्या साठ्यावरही केंद्र सरकारने मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या दरात घसरण होण्याचीच चिन्ह आहेत. शिवाय आता बाजार समित्यांमध्ये होणारी आवकही वाढली आहे. सोयाबीनसाठी प्रसिद्ध असलेल्या लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी साधारणपणे 15 हजार क्विंटलची आवक सुरू आहे. त्यामुळे सोयाबीनचे घसरत असून ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. हे वाचा - अरे वा! आता शेतीशिवाय कॉफीचं उत्पन्न; जाणून घ्या या नव्या तंत्राविषयी… सोयाबीनचे ताजे दर वाचा -
  दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
  16/10/2021 अहमदनगर --- क्विंटल 1216 4287 5021 4655
  16/10/2021 अहमदनगर लोकल क्विंटल 1410 3800 5191 5050
  16/10/2021 अकोला पिवळा क्विंटल 1830 4225 5000 4700
  16/10/2021 औरंगाबाद --- क्विंटल 145 3500 5100 4300
  16/10/2021 औरंगाबाद पिवळा क्विंटल 7 4595 4595 4595
  16/10/2021 बीड --- क्विंटल 4284 4410 5126 4925
  16/10/2021 बीड पिवळा क्विंटल 144 4538 4901 4790
  16/10/2021 भंडारा पिवळा क्विंटल 29 3600 4400 4000
  16/10/2021 बुलढाणा लोकल क्विंटल 920 3800 4820 4600
  16/10/2021 बुलढाणा पिवळा क्विंटल 8296 4100 4901 4500
  16/10/2021 चंद्रपुर पिवळा क्विंटल 70 4200 4200 4200
  16/10/2021 हिंगोली लोकल क्विंटल 900 4555 5085 4820
  16/10/2021 हिंगोली पिवळा क्विंटल 534 4400 4700 4550
  16/10/2021 जळगाव लोकल क्विंटल 153 4501 4956 4956
  16/10/2021 जळगाव पिवळा क्विंटल 37 4430 5000 4430
  16/10/2021 जालना लोकल क्विंटल 80 2600 5150 4275
  16/10/2021 जालना पिवळा क्विंटल 20143 3750 5106 4926
  16/10/2021 लातूर --- क्विंटल 3600 5100 5276 5188
  16/10/2021 लातूर पिवळा क्विंटल 8578 4684 5191 5045
  16/10/2021 नागपूर लोकल क्विंटल 2503 4000 5150 4863
  16/10/2021 नांदेड --- क्विंटल 5 3500 3500 3500
  16/10/2021 नांदेड पिवळा क्विंटल 865 4500 5023 4740
  16/10/2021 नाशिक पिवळा क्विंटल 12 3950 4500 4300
  16/10/2021 उस्मानाबाद --- क्विंटल 600 5000 5000 5000
  16/10/2021 उस्मानाबाद पिवळा क्विंटल 79 4995 5003 4999
  16/10/2021 परभणी पिवळा क्विंटल 491 4484 5151 4967
  16/10/2021 सातारा पांढरा क्विंटल 50 5100 5300 5200
  16/10/2021 सोलापूर लोकल क्विंटल 233 4271 5180 5001
  16/10/2021 वर्धा पिवळा क्विंटल 12909 3667 4992 4633
  16/10/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 970 4900 5100 5000
  राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 71093
  Published by:News18 Desk
  First published: