• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • लातूर बाजार समितीत अचानक सोयाबीनची आवक का वाढली? जाणून घ्या लेटेस्ट सोयाबीन रेट

लातूर बाजार समितीत अचानक सोयाबीनची आवक का वाढली? जाणून घ्या लेटेस्ट सोयाबीन रेट

सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची किंमत (soyabean price) किमान आधारभूत किंमती (MSP) च्या खाली गेली आहे. मात्र, तरीही नाईलाजास्तव अनेक शेतकरी दिवाळीच्या खर्चासाठी सोयाबीन विकत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑक्टोबर : काढणीनंतर सोयाबीनच्या दरात सातत्यानं घसरण होत (latest soyabean rate in Maharashtra) असल्यानं गेल्या काही दिवसांपासून शेतकरी सोयाबीन विकण्याऐवजी साठवणुकीवर भर देत आहेत. मात्र, शनिवारी आवक अचानक वाढल्याचे दिसून आले. मात्र, दरात वाढ झाल्यानं आवक वाढली वैगेरे, असे कोणतेही कारण नसून सोमवारपासून लातूरच्या बाजार समितीतील सौदे दिवाळीनिमित्त पाच दिवस बंद राहणार आहेत. दिवाळीमुळं शनिवारी सोयाबीनची आवक आधीच वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्यानुसार आवक वाढल्याचे दिसून आले. सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची किंमत (soyabean price) किमान आधारभूत किंमती (MSP) च्या खाली गेली आहे. मात्र, तरीही नाईलाजास्तव अनेक शेतकरी दिवाळीच्या खर्चासाठी सोयाबीन विकत आहेत. दिवाळीमुळे बाजार समित्या बंद दिवाळीनिमित्त बाजार समित्या बंद राहणार आहेत. पणन संचालनालयाच्या नियमानुसार बाजार समित्या फक्त तीन दिवस बंद ठेवता येतात. मात्र, अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी एकमताने पाच ते आठ-दहा दिवस बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारपेठेत मालाची आवक वाढली होती. लातूर बाजार समिती सोमवारपासून पाच दिवस व्यापार बंद ठेवणार आहे. त्यामुळेच शनिवारी राज्यात जवळपास 115152 क्विंटल सोयाबीन बाजारात आले. शेतकऱ्यांनी आधीच खराब झालेले सोयाबीन विकले असून चांगल्या प्रतीचे सोयाबीन साधारण 5,150 रुपयांना विकलं जात आहे. हे वाचा - जोरदार पावसाने नोव्हेंबरच होणार स्वागत; उद्यापासून राज्यात मेघगर्जनेसह कोसळणार सरी सोयाबीनची आवक दुपटीने वाढली यापूर्वी निसर्गाने राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे आणि आता कमी भावामुळे ते नाराज झाले आहेत. यंदा सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीन कमी आणि आर्द्रता कमी असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवण्याऐवजी विक्रीवर भर दिला. त्याचबरोबर आता सोयाबीनच्या दरात क्वचितच वाढ होणार असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, ज्याची आम्ही आता प्रतीक्षा करू शकत नाही, त्यामुळे आम्ही दिवाळीच्या सणात सोयाबीनची विक्री करत आहोत. मात्र, यातून आम्हाला कोणताही फायदा होणार नाही. सोयाबीनच्या भावात इतकी घसरण झाली की खर्च निघाला तरी भरपूर आहे, अशी स्थिती आहे. हे वाचा - 5 रुपयांचं नाणं देऊन 5 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; 65 वर्षीय व्यक्ती अटकेत सोयाबीनचे ताजे दर -
  दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
  31/10/2021 औरंगाबाद --- क्विंटल 175 4200 5175 4800
  31/10/2021 लातूर --- क्विंटल 6300 5200 5250 5225
  31/10/2021 लातूर पिवळा क्विंटल 113 5080 5430 5255
  31/10/2021 पुणे --- क्विंटल 2 4700 4700 4700
  31/10/2021 वर्धा पिवळा क्विंटल 316 3650 4860 4300
  राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 6906
  30/10/2021 अहमदनगर --- क्विंटल 251 4450 5163 4844
  30/10/2021 अहमदनगर लोकल क्विंटल 574 3500 5151 4975
  30/10/2021 अकोला पिवळा क्विंटल 7066 4200 5050 4700
  30/10/2021 औरंगाबाद --- क्विंटल 147 4200 4840 4520
  30/10/2021 औरंगाबाद पिवळा क्विंटल 33 4080 4737 4591
  30/10/2021 बीड --- क्विंटल 3216 4100 5041 4750
  30/10/2021 बीड पिवळा क्विंटल 655 4450 4993 4875
  30/10/2021 बुलढाणा लोकल क्विंटल 3190 4200 5140 4700
  30/10/2021 बुलढाणा पिवळा क्विंटल 3429 4050 5301 4750
  30/10/2021 चंद्रपुर पिवळा क्विंटल 166 4400 5100 4700
  30/10/2021 धुळे हायब्रीड क्विंटल 5 4105 4105 4105
  30/10/2021 हिंगोली लोकल क्विंटल 900 4500 5250 4875
  30/10/2021 हिंगोली पिवळा क्विंटल 1897 4050 4900 4575
  30/10/2021 जळगाव --- क्विंटल 43 4200 4800 4700
  30/10/2021 जळगाव लोकल क्विंटल 135 4200 5000 5000
  30/10/2021 जळगाव पिवळा क्विंटल 63 2900 4895 4275
  30/10/2021 जालना पिवळा क्विंटल 13330 4308 5117 4967
  30/10/2021 लातूर --- क्विंटल 6500 5200 5240 5220
  30/10/2021 लातूर पिवळा क्विंटल 16380 4241 5331 5108
  30/10/2021 नागपूर लोकल क्विंटल 4241 4000 5300 4975
  30/10/2021 नागपूर पिवळा क्विंटल 6195 3751 5069 4938
  30/10/2021 नांदेड पिवळा क्विंटल 995 4267 5018 4634
  30/10/2021 नंदुरबार --- क्विंटल 663 3601 5161 4952
  30/10/2021 नाशिक --- क्विंटल 2280 3000 5277 5100
  30/10/2021 नाशिक लोकल क्विंटल 90 3000 5272 4800
  30/10/2021 नाशिक पिवळा क्विंटल 32 4181 4871 4501
  30/10/2021 उस्मानाबाद पिवळा क्विंटल 13760 41 50 50
  30/10/2021 परभणी पिवळा क्विंटल 1814 4374 5128 4930
  30/10/2021 पुणे --- क्विंटल 4 4000 4550 4550
  30/10/2021 सातारा पांढरा क्विंटल 25 5100 5300 5200
  30/10/2021 सोलापूर लोकल क्विंटल 283 4000 5205 5100
  30/10/2021 वर्धा पिवळा क्विंटल 13580 4084 5130 4670
  30/10/2021 वाशिम --- क्विंटल 10950 4105 5080 4650
  30/10/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 2260 4650 5025 4850
  राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 115152
  दर स्त्रोत - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
  Published by:News18 Desk
  First published: