मुंबई, 1 जानेवारी: आजपासून म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून पॉलिसीधारकांना सर्व विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी त्यांची KYC कागदपत्रे प्रदान करावी लागतील. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने आरोग्य, वाहन, घर इत्यादी सर्व नवीन विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी KYC नियम अनिवार्य केले आहेत. हा नियम सर्व प्रकारच्या विम्याला लागू होईल. आतापर्यंत विमा खरेदी करताना केवायसी कागदपत्रे जमा करणं पर्यायी होते. परंतु आजपासून विमाधारकांना त्यांच्या संबंधित ग्राहकांकडून केवायसी कागदपत्रे गोळा करावी लागतील.
तज्ञांचा असा विश्वास आहे की, या नवीन नियमामुळे क्लेम प्रोसेसिंग प्रक्रिया जलद होऊ शकते कारण विमा कंपन्यांकडे ग्राहकांची विस्तृत प्रोफाइल असेल. विमा कंपन्यांसाठी, केवायसी तपशील जोखीम मूल्यांकन आणि किंमतींची अचूकता सुधारण्यास मदत करू शकतात आणि त्यामुळं खोट्या दाव्यांचा धोका कमी होऊ शकतो.
हेही वाचा: New Year : जानेवारी महिन्यात 14 दिवस बंद राहणार बँक, पाहा संपूर्ण लिस्ट
आयआरडीएनेही दिल्या सूचना -
माहितीनुसार, IRDA ने विमा कंपन्यांना कोविड-19 लसीचे तीन शॉट्स घेतलेल्या पॉलिसीधारकांना सामान्य आणि आरोग्य विमा पॉलिसींच्या नूतनीकरणावर माफी देण्याचा विचार करण्यास सांगितले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की विमा नियामकाने लाइफ आणि नॉन लाइफ विमा कंपन्यांना कोविड-19 संबंधित क्लेम लवकरात लवकर निकाली काढण्यास आणि कागदपत्रे कमी करण्यास सांगितलं आहे.
विमा कंपन्यांनी सर्वात वाईट परिस्थितीसाठी सर्व लाभार्थ्यांना कोविड-संबंधित सहाय्यासाठी वॉर रूम तयार करावी, IRDA ने इन्शुरन्स कंपन्यांना सांगितलं आहे की डेटा विहित स्वरूपात नोंदविला जावा जेणेकरून कोणतीही विसंगती होणार नाही.
दुसरीकडे, विमा कंपन्यांनी रेग्युलेटरला उपचार प्रोटोकॉलकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन फसवणूकीची प्रकरणे कमी करता येतील. आपल्या ताज्या वार्षिक अहवालात, IRDA ने म्हटले आहे की मार्च 2022 पर्यंत, कोविडमुळे 2.25 लाखांहून अधिक मृत्यूचे दावे विमा कंपन्यांनी निकाली काढले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.