Home /News /money /

SBI आणि Axis बँकेनंतर 'या' बँकेने व्याजदर वाढवले; ग्राहकांना किती टक्के जास्त व्याज भरावं लागणार?

SBI आणि Axis बँकेनंतर 'या' बँकेने व्याजदर वाढवले; ग्राहकांना किती टक्के जास्त व्याज भरावं लागणार?

5 बेसिस पॉइंट वाढ म्हणजे बँकेकडून कर्जावरील व्याजदरात 0.05 टक्के वाढ झाली आहे. या वाढीनंतर नवीन ग्राहकांना केवळ कर्ज महाग होणार नाही तर आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा ईएमआय वाढेल.

    मुंबई, 19 एप्रिल : स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँकेने व्याजदर वाढवल्यानंतर आता कोटक महिंद्र बँकेनेही आपले व्याजदर वाढवले आहेत. कोटक महिंद्रा बँकेने मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR) 5 बेस पॉईंटने वाढवला आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर 16 एप्रिलपासून लागू झाले आहेत. यानंतर बँकेने दिलेली बहुतांश कर्जे महाग झाली आहेत. आता बँकेचा MCLR दर 6.65 टक्के आहे आणि एक वर्षाचा MCLR दर 7.4 टक्के आहे. 5 बेसिस पॉइंट वाढ म्हणजे बँकेकडून कर्जावरील व्याजदरात 0.05 टक्के वाढ झाली आहे. या वाढीनंतर नवीन ग्राहकांना केवळ कर्ज महाग होणार नाही तर आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा ईएमआय वाढेल. होम, ऑटो लोनसह इतर लोनही महाग; 'या' बँकांनी वाढवले व्याजदर, चेक करा नवे दर आतापर्यंत कोणत्या बँकांनी MCLR वाढवला आहे? यापूर्वी, SBI ने MCLR 10 बेस पॉइंट्स किंवा 0.10 टक्क्यांनी वाढवला होता. त्याच वेळी, अॅक्सिस बँकेने कोटक महिंद्राप्रमाणे 5 बेस पॉइंट्स किंवा 0.05 टक्क्यांने वाढ केली आहे. SBI ने तीन महिन्यांचा LCLR 6.75 टक्के, सहा महिन्यांचा MCLR 7.05 आणि 1 वर्षाचा MCLR 7.40 टक्के केला आहे. दोन आणि तीन वर्षांसाठी EMCLR अनुक्रमे 7.30 आणि 7.40 टक्के असेल. त्याच वेळी, अॅक्सिस बँकेचा एक वर्षाचा MCLR 7.35 टक्के झाला आहे. इतर बँकांनीही MCLR वाढवणे अपेक्षित या बँकांचे कर्ज महाग झाल्यानंतर इतर बँकाही लवकरच एमसीएलआर वाढवण्याची शक्यता आहे. या वाढत्या भीतीमागे एक मोठे कारण आहे की SBI ने कर्ज महाग केले आहे. त्यानंतर एसबीआयचे हे पाऊल पाहता इतर बँका आणि फायनान्स कंपन्या कर्ज महाग करू शकतात. त्याचप्रमाणे वाढती महागाई पाहता आरबीआयनेही कर्ज महाग होणार असल्याचे संकेत दिले आहेत. यंदा RBI रेपो रेटमध्ये 3-4 वेळा वाढ करू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसे झाल्यास त्याचा बोजा थेट कर्जदारांवर पडणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2016 पासून MCLR हा कर्ज देण्यासाठी आधार मानला जातो. पूर्वी आधारभूत दराने कर्ज दिले जात होते. मात्र, मूळ दराने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार नाही, असे नाही. बँका त्यांचा EMI वाढवून MCLR नुसार भरपाई करू शकतात. Bank Time: आजपासून बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल, ग्राहकांना होईल फायदा SBI आणि Axis बँकेने किती व्याजदर वाढवले? SBI ने आपले कर्ज महाग केले आहे. बँकेने सोमवारी सांगितले की व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढले आहेत. नवीन व्याजदर 15 एप्रिलपासून लागू झाल्याचे बँकेने म्हटले आहे. खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेनेही व्याजदरात 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Axis Bank, Loan, Rate of interest

    पुढील बातम्या