मुंबई, 15 एप्रिल : बँक एफडी (Bank Fixed Deposit) हा देशातील गुंतवणुकीचा पारंपरिक पर्याय (Investment Option) आहे. लोकांची अशी मानसिकता आहे की बँकांमधील पैसा सुरक्षित असतो आणि परतावाही हमखास आहे. यामध्ये बाजारातील अस्थिरतेचा धोका नाही. मात्र बँक एफडीमध्येही काही जोखीम घटक असतात. जर तुम्ही देखील बँक एफडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. झी बिझनेस ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. लोक बँक एफडी पूर्णपणे सुरक्षित (Secure Investment) मानतात आणि त्यांची मोठी रक्कम जमा करतात. FD मधील पैसे सुरक्षित असले तरी बँकेने कोणत्याही स्थितीत डिफॉल्ट केले तर गुंतवणूकदारांची फक्त 5 लाखांपर्यंतची ठेव सुरक्षित राहते. हाच नियम फायनान्स कंपन्यांनाही लागू आहे. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) फक्त 5 लाख रुपयांपर्यंतच्या बँक ठेवींवर विमा हमी देते. Pension Scheme: दरमाह गुंतवणूक करुन भविष्यात चिंतामुक्त व्हा; निवृत्तीनंतरही मिळेल 50 हजारांची पेन्शन बँक एफडीवरील परतावा म्हणजेच व्याजदर निश्चित आणि पूर्वनिर्धारित असतो. पण महागाई वाढू शकते. अशा परिस्थितीत, जर महागाई अॅडजस्ट केली तर सध्याच्या युगात FD वर मिळणारा परतावा खूपच कमी आहे. समजा महागाईचा दर 6 टक्के झाला आणि एफडीवरील व्याज 5 ते 6 टक्के असेल तरच तुम्हाला मिळणारा परतावा तुलनेने कमी मिळेल. बँक एफडीमध्ये लिक्विडिटीची समस्या आहे. जरी गरज भासल्यास एफडी मोडली जाऊ शकते, परंतु प्री-मॅच्युअर दंड भरावा लागेल. एफडीवर दंडाची रक्कम वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगळी असू शकते. जर तुम्ही कोणत्याही करबचत एफडीमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही ती 5 वर्षांच्या कार्यकाळापूर्वीच काढू शकता. मात्र त्यानंतर तुम्हाला आयकरात सूट मिळणार नाही. Health Insurance: ‘या’ कंपनीकडून आरोग्य विमा खरेदी करु नका, विमा नियामक IRDA चा सावधगिरीचा इशारा बाजारात ठेवीवरील व्याजदर कमी होत असतील तर अशा परिस्थितीत, तुम्ही FD मध्ये पुनर्गुंतवणुकीचा पर्याय निवडल्यास, ती रक्कम आपोआप पुन्हा गुंतवली जाईल. पण, इथे तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जर बाजारात व्याजदर आणखी कमी होत असतील, तर तुमची FD जुन्या दराने होणार नाही, तर ती कमी झालेल्या व्याजदरावरच असेल. या प्रकरणात, तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी परतावा मिळेल. लोक 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षे इत्यादी राउंड फिगर नावाच्या कालावधीनुसार FD करतात. काही बँकांमध्ये, या राऊंड फिगर कालावधीसाठी, FD वरील व्याज दर 1 किंवा थोड्या जास्त किंवा कमी दिवसांपर्यंत बदलतो. म्हणून, एफडी उघडण्यापूर्वी, एफडीचा कालावधी आणि त्यावरील व्याज जाणून घ्या. हे शक्य आहे की राउंड फिगर पीरियड ऐवजी, काही जास्तीचे व्याज काही दिवस कमी-अधिक काळासाठी उपलब्ध असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.