मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँकेमध्ये रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक अपडेट करायचा आहे? ATM च्या माध्यमातून अशाप्रकारे करा हे काम

बँकेमध्ये रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक अपडेट करायचा आहे? ATM च्या माध्यमातून अशाप्रकारे करा हे काम

तुमच्या बँक खात्यामध्ये रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक सुरू असणं आवश्यक आहे. अन्यथा बँकेशी संबंधित अनेक महत्त्वाचे अपडेट तुम्ही मिस करू शकता.

तुमच्या बँक खात्यामध्ये रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक सुरू असणं आवश्यक आहे. अन्यथा बँकेशी संबंधित अनेक महत्त्वाचे अपडेट तुम्ही मिस करू शकता.

तुमच्या बँक खात्यामध्ये रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक सुरू असणं आवश्यक आहे. अन्यथा बँकेशी संबंधित अनेक महत्त्वाचे अपडेट तुम्ही मिस करू शकता.

नवी दिल्ली, 14 जानेवारी: सध्या बँक खात्याबाबतीत (Bank Account) ग्राहकांनी अलर्ट राहणं फार आवश्यक आहे. तुमचा मोबाइल नंबर बँक खात्याशी जोडलेला असणं हे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्याबाबत आवश्यक माहिती वेळेत मिळेल. बँक खात्याशी मोबाइल नंबर (Mobile Number) जोडलेला असेल, तर खात्याशी संबंधित अगदी बारीकसारीक गोष्टींचे अपडेट्सही आपल्याला मिळत राहतात; पण बँक खात्याशी जोडलेल्या नंबरला काही समस्या निर्माण झाली किंवा आपला मोबाइल नंबर बदलला, तर मोठी अडचण होऊ शकते. अलीकडे खोट्या मोबाइल नंबरच्या साहाय्याने बँकेचे अनेक घोटाळे (Frauds) केले जात आहेत. तसं काही झालं तर बँक खातं रिकामंही होऊ शकतं. त्यामुळे आपला मोबाइल नंबर बदलला, तर बँकखात्याशी निगडित नंबरही लगेचच बदलून घेतला पाहिजे. कोणत्याही बँकेच्या खात्याशी जोडलेला मोबाइल नंबर (Registered Mobile Number) बदलायचा असेल, तर काही अगदी सोप्या अशा काही स्टेप्समध्ये तुम्ही तो नंबर बदलू शकता. बँकखात्याशी निगडित मोबाइल नंबर ऑनलाइन (Online Method) आणि ऑफलाइन (Offline Method) अशा दोन्ही पद्धतीने बदलता येऊ शकतो. त्याचप्रमाणे एटीएम मशिनच्या माध्यमातून देखील तुम्ही हे काम पूर्ण करू शकता. एटीएम मशिन वापरून अपडेट करू शकता तुमचा मोबाइल क्रमांक -तुम्ही जर SBI ग्राहक असाल तर ही प्रक्रिया तुम्ही मोबाइल क्रमांक बदलण्यासाठी वापरू शकता. यासाठी याच बँकेचं ATM वापरा -ATM कार्ड मशिनमध्ये इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करावं लागेल. -ATM पिन टाकल्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर रजिस्ट्रेशनचा पर्याय निवडावा लागेल. -याठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन करा -त्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाका आणि Correct हा पर्याय निवडा -आता तुमच्या मोबाइल क्रमांकावर Reference Number आणि OTP आला असेल तो SBI चा क्रमांक 567676 वर पाठवा. -तुम्हाला ACTIVATE- Reference Number- OTP टाकून 567676 वर पाठवावा लागेल -यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट होईल. ऑनलाइन असा बदला बँकेमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबर - तुमच्याकडे नेटबँकिंगची (Netbanking) सुविधा असेल, तर तुम्ही अगदी घरसबल्या मोबाइल किंवा कम्प्युटरद्वारे बँक खात्याशी जोडलेला नंबर बदलू शकता. - आपण एक उदाहरण पाहू या. तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियात (SBI) खातं असेल, तर सर्वांत आधी तुम्हाला नेटबँकिंगच्या वेबसाइटवर म्हणजे www.onlinesbi.com या लिंकवर जावं लागेल. त्यानंतर तुम्ही जेव्हा अकाउंटमध्ये लॉगिन कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करावं लागेल - त्यानंतर पर्सनल डिटेल्स या पर्यायावर क्लिक करावं. - त्यानंतर तुम्हाला प्रोफाइल पासवर्ड द्यावा लागेल. - पासवर्ड सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ई-मेल आयडी आणि तुमचा जुना मोबाइल नंबर दिसेल. तसंच मोबाइल नंबर बदलण्याचा पर्यायही तिथे उपलब्ध असेल. - तिथे दिलेल्या सूचनांचा अवलंब करून तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर बदलता येईल
First published:

Tags: ATM, Bank

पुढील बातम्या