मुंबई, 18 मे: हल्ली पैशांचे व्यवहार करण्याचे अनेक मार्ग निर्माण झाले आहेत. बँकेचे पैशांचे व्यवहारदेखील आता आपल्या स्मार्टफोनवरून आपल्याला सहज करता येतात. कोणालाही पैसे पाठवणं किंवा कोणाकडून पैसे घेणं आता अगदी सोपं झालं आहे; मात्र स्मार्टफोनवरून किंवा एखाद्या अॅप्लिकेशनच्या साह्याने व्यवहार करताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. ऑनलाइन पैशांचे व्यवहार (Online Money Transfer) कसे करावेत, याची आपल्याला पुरेशी माहिती असणं गरजेचं आहे. ऑनलाइन व्यवहार जेवढे सोपे तेवढेच अवघडदेखील असतात. एखादेवेळी आपण पैसे पाठवत असताना चुकून ते पैसे कोण्या दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याची शक्यता असते. असं झाल्यास घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारण चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास ते तुम्हाला परत मिळू शकतात. असं झाल्यास पैसे परत कसे मिळू शकतात, याबद्दल माहिती घेऊ या. याबद्दलचं सविस्तर वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे.
पैशांचा व्यवहार करताना तुमच्याकडून चुकून पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्स्फर झाले असतील तर त्वरित तुमच्या बँकेला याची माहिती द्या. त्याचबरोबर कस्टमर केअरला (Customer Care) फोन करून घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती द्या. बँकेने तुम्हाला ई-मेलवर सर्व माहिती विचारली, तर या चुकून झालेल्या व्यवहाराची माहिती द्या. यामध्ये झालेल्या व्यवहाराची तारीख आणि वेळ, तुमचा खाते क्रमांक आणि ज्या खात्यात तुमच्याकडून चुकून पैसे ट्रान्स्फर झाले आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती द्या.
CIBIL Score कमी असला तरी घेता येईल पर्सनल लोन,या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
घडलेला प्रकार तुम्ही बँकेला कळवल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. काही वेळा अशी प्रकरणं सोडवण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधीदेखील लागू शकतो. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन याबद्दल चौकशी करू शकता, की ट्रान्स्फर झालेली रक्कम कोणत्या शहरातल्या कोणत्या बँकेच्या कोणत्या शाखेतल्या खात्यात जमा झाली आहे. मग तुम्ही तुमच्या शाखेशी बोलून पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. यानंतर ज्या व्यक्तीच्या खात्यात तुमचे पैसे जमा झाले आहेत त्या व्यक्तीच्या बँकेला तुमची बँक घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती देईल. त्यानंतर ती बँक त्या व्यक्तीकडून हे चुकून ट्रान्स्फर झालेले पैसे परत करण्याची परवानगी मागते.
शेअर बाजारात आजही तेजीची शक्यता, कोणते फॅक्टर्स ठरतील महत्वाचे?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Money debt