जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Job Opportunity : काम अत्यंत साधं, कोट्यवधींचा वार्षिक पगार तरीही मिळत नाहीत कामगार

Job Opportunity : काम अत्यंत साधं, कोट्यवधींचा वार्षिक पगार तरीही मिळत नाहीत कामगार

Job Opportunity : काम अत्यंत साधं, कोट्यवधींचा वार्षिक पगार तरीही मिळत नाहीत कामगार

सिडनीच्या काही भागात अजूनही क्लिनर शोधण्यासाठी धडपड सुरू आहे. अ‍ॅबसोल्युट डोमेस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अधिक तास काम करण्याची परवानगी देण्यासाठी सरकारला आवाहन करत आहेत.

  • -MIN READ Jobat,Alirajpur,Madhya Pradesh
  • Last Updated :

मुंबई, 20 जुलै : नोकरीच्या संधी कमी असल्याने भारतात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या उलट परदेशात माणसं कमी आणि काम जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे जास्त पगार देऊनही एखाद्या साध्या कामासाठी तिकडे कामगार मिळत नाहीत. ऑस्ट्रेलियात एका साध्या कामासाठी वर्षाला सुमारे एक कोटी रुपये दिले जात आहेत. मात्र एवढी मोठी रक्कम ऑफर करुनही या कामासाठी कामगार मिळत नसल्याची समस्या आहे. सफाई कामगारांच्या कामासाठी लोकांची गरज आहे. गूड रिटर्न्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कामगारांची कमतरता आहे. त्यामुळे नवीन सफाई कामगारांना कंपन्यांकडून दरवर्षी 90,000 डॉलर (सुमारे 72 लाख रुपये) पेक्षा जास्त वेतन दिले जात आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सिडनीस्थित क्लिनर कंपनी अॅब्सोल्युट डोमेस्टिक्सच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांना इतके पैसे द्यावे लागत आहेत. कोणताही अनुभव नसलेल्या सफाई कामगाराला जो आठवड्यातून पाच दिवस आणि दिवसाचे आठ तास काम करतो त्याला वार्षिक 93,600 डॉलर (अंदाजे 75 लाख रुपये) पगार दिले जाईल. एवढा मोठा पगार असूनही ही कामं करायला लोक मिळत नाहीत. “शिक्षण नाही तर काहीच नाही” असे विचार आता सोडा; 12वी पास नसाल तरीही ‘हे’ जॉब्स मिळतीलच 2021 पासून कामगारांची कमतरता अॅब्सोल्युट डोमेस्टिक्सच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या मते, 2021 च्या मध्यापासून त्यांना व्यावसायिक सेवेसाठी पुरेसे क्लिनर मिळू शकले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, नऊ महिन्यांपूर्वी त्यांनी तासाचा दर 35 डॉलर पर्यंत वाढवला होता. पण त्याचाही काही चांगला परिणाम झाला नाही. आता कोणाचीही बॉसगिरी सहन करू नका; स्वतःच व्हा स्वतःचे Boss; असं करा फ्रिलान्सिंग सिडनीच्या काही भागात अजूनही क्लिनर शोधण्यासाठी धडपड सुरू आहे. अ‍ॅबसोल्युट डोमेस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अधिक तास काम करण्याची परवानगी देण्यासाठी सरकारला आवाहन करत आहेत. दरम्यान, इतर सफाई कंपन्याही जास्त पगार देत आहेत. तिथली शहरी कंपनी एका तासाला 35 डॉलर पगार देत होती, पण आता तिथे कर्मचाऱ्यांना 40 डॉलर ते 54.99 डॉलर प्रति तास पगार दिला जात आहे. मात्र ही रक्कम लवकरच तासाला 60 डॉलर पर्यंत पोहचू शकते. याचा अर्थ असा की फर्मसाठी पूर्ण वेळ काम करणारा क्लिनर वार्षिक 124,800 डॉलर कमवेल. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे एक कोटी रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: job , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात