जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Mutual Fund SIP: केवळ 250 महिन्यांत व्हाल करोडपती, रोज वाचवा फक्त 100 रूपये

Mutual Fund SIP: केवळ 250 महिन्यांत व्हाल करोडपती, रोज वाचवा फक्त 100 रूपये

Mutual Fund SIP: केवळ 250 महिन्यांत व्हाल करोडपती, रोज वाचवा फक्त 100 रूपये

Mutual Fund SIP: केवळ 250 महिन्यांत व्हाल करोडपती, रोज वाचवा फक्त 100 रूपये

Mutual Fund SIP: बहुतेक लोक पगार कमी असल्याची सबब पुढे करतात आणि बचत करण्यापासून दूर पळतात. परंतु असे लोक म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवू शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 सप्टेंबर: आपण खूप पैसे कमवावे आणि करोडपती व्हावं अशी स्वप्नं तर सारेच करतात. पण नुसतं स्वप्न पाहून एवढी रक्कम तुमच्या बँक खात्यात पोहोचणार नाही. यासाठी तुम्हाला नियमितपणे गुंतवणूक करावी लागेल. आता मध्यमवर्गीय कुटुंबाची अडचण अशी असते की ते एकाच वेळी खूप मोठी रक्कम जमा करू शकत नाहीत, ते आपलं उत्पन्न वाढण्याची वाट पाहतात आणि त्यातून पुन्हा गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. वास्तविक आजच्या युगात प्रत्येकाला पैशाची गरज आहे. प्रत्येक माणसाला करोडपती व्हायचं असतं. पण तरीही लोक गुंतवणूक करण्यापासून दूर पळतात. परंतु एक लक्षात ठेवायला हवी की, करोडपती होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. पैशानं पैसा वाढतो हे देखील खरं आहे. पगार कमी आहे, म्हणून बचत करता येत नाही, उत्पन्न थोडं वाढलं, तर दर महिन्याला थोडेफार पैसे वाचतील आणि मग गुंतवणूक करू, असा बहाणा बहुतेक लोक करतात. पण असे लोक नुसती वाट बघत राहतात. गुंतवणुकीला सुरुवात करण्यासाठी पैशापेक्षा जास्त इच्छाशक्तीची गरज असते. छोट्या रकमेतून गुंतवणूक सुरू करा- मोठ्या रकमेनं गुंतवणूक सुरू करणं आवश्यक नाही. तुम्ही दररोज किंवा दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवून मोठा निधी उभारू शकता. म्युच्युअल फंडाच्या या टप्प्यात तुम्ही छोट्या रकमा जोडून मोठा निधी उभारू शकता. SIP ची ताकद अशी आहे की तुम्ही दररोज फक्त 100 रुपये वाचवून 1 कोटी रुपये उभे करू शकता. सूत्र अगदी सोपं आहे. आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की, अलीकडच्या काळात लोकांना म्युच्युअल फंडाविषयी बऱ्यापैकी माहिती आहे. यामध्ये दर महिन्याला गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP), तुम्ही म्युच्युअल फंडात दरमहा 3000 रुपये गुंतवून म्हणजे प्रतिदिन रु. 100 गुंतवून करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला 21 वर्षे म्हणजेच 250 महिन्यांची गुंतवणूक करावी लागेल. हेही वाचा:  फक्त 100 रुपये वाचवून करोडपती व्हा- लक्षणीय बाब म्हणजे, म्युच्युअल फंडांनी दीर्घ कालावधीत जोरदार परतावा दिला आहे. काही फंडांनी 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. आता आम्ही तुम्हाला 250 महिन्यांत 100 रुपये गुंतवून 1 कोटी रुपये कसे मिळवू शकता ते सांगणार आहोत. हिशोब असा आहे की जर तुम्ही दररोज 100 रुपये वाचवले तर ही रक्कम एका महिन्यात 3000 रुपये होते. म्युच्युअल फंडात गुंतवल्यास, 20 टक्के वार्षिक परताव्यानुसार, 21 वर्षांत म्हणजेच (252 महिने) रु. 1,16,05,388 (एक कोटींहून अधिक) रुपये होतील. पण त्यासाठी या 21 वर्षात तुम्हाला फक्त 7,56,000 रुपये जमा करायचे आहेत. दुसरीकडे, परतावा फक्त 15 टक्के असला तरी, तुम्हाला 53 लाख रुपये मिळतील. अशा परिस्थितीत तुम्ही दररोज 100 रुपये सहज वाचवू शकता. जर तुम्हाला 21 वर्षे गुंतवणूक करायची नसेल तर तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम वाढवावी लागेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की म्युच्युअल फंडामध्ये चक्रवाढ व्याज मिळाल्यानं, अगदी लहान गुंतवणूक देखील एक मोठा दीर्घकालीन फंड बनते. तथापि, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना जोखीम असते. त्यामुळे कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात