मुंबई: महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी RBI ने रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ केली. त्यानंतर सगळ्या बँकांनी EMI आणि व्याजदरात वाढ केली. ग्राहकांना टिकून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे FD आणि RD वरील व्याजदरात वेगानं घट होत आहे. त्यामुळे ग्राहक शेअर मार्केट, बाँडकडे वळत आहेत. दुसरी बँक बुडण्याची भीती असल्याने बँकेत जास्त पैसे ठेवत नाही. मात्र आता बँका सुरक्षेची हमी देऊन ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर देत आहेत. एका नामांकीत बँकेनं ग्राहकांना आता RD साठी ऑफर दिली आहे. तसा SMS देखील केला आहे. एचडीएफसी बँकेने RDवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवे दर 11 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आले. एचडीएफसी बँकेने ठरावीक मुदतीच्या व्याजदरात ५० बेसिस पॉइंटपर्यंत वाढ केली. बँकेने 6 ते 36 महिने आणि 90 ते 120 महिन्यांपर्यंत पूर्ण होणाऱ्या आरडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नव्या दरवाढीनंतर एचडीएफसी बँक आता सामान्यांसाठी 6 महिने ते 120 महिने या कालावधीसाठी आरडीवर 4.25% ते 6.10 टक्के व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एचडीएफसी बँकेने आपल्या व्याजदरात अतिरिक्त व्याज देऊ केले आहे. बँक आता ज्येष्ठ नागरिकांना 6 महिने ते 120 महिन्यांपर्यंत आरडीवर 4.75% ते 6.75% व्याज दर देणार आहे. FD आणि RD मध्ये काय फरक? RD तुम्ही दर महिन्याला एक ठरावीक रक्कम बँकेत तुमच्या खात्यातून जाते किंवा तुम्हाला भरावी लागते. तुम्ही लिक्वीड किंवा डिजिटल RD काढली तर ती तुम्हाला मोडताही येते. पावती करून काढली तर ती मोडण्यासाठी तुमची सही लागते. FD साठी तुम्ही ठरावीक रक्कम १ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी फिक्स करून ठेवता. त्यासाठी तुम्हाला महिन्याला कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही. एक रक्कम तुम्ही काही ठरावीक काळासाठी लॉक करता. हे पैसे तुम्हाला मॅच्युरिटी झाल्यावर मिळतात. एचडीएफसी बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन दर 11 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहेत. या वाढीनंतर एचडीएफसी बँकेचे नवीन आरडी दर सामान्य जनतेसाठी 7 दिवस ते 10 वर्षात परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 3.00% ते 6.00% पर्यंत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना या ठेवींवर 3.50% ते 6.75% पर्यंत व्याजदर मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.