जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Insurance Policy : मोबाइल सिमप्रमाणे इन्शुरन्स पॉलिसीही करता येऊ शकेल पोर्ट, चेक करा प्रोसेस

Insurance Policy : मोबाइल सिमप्रमाणे इन्शुरन्स पॉलिसीही करता येऊ शकेल पोर्ट, चेक करा प्रोसेस

Insurance Policy : मोबाइल सिमप्रमाणे इन्शुरन्स पॉलिसीही करता येऊ शकेल पोर्ट, चेक करा प्रोसेस

विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीजच्या (Personal Accident Insurance Policy) नूतनीकरणाशी संबंधित काही नियम बदलण्याची योजना आखत आहे. या संदर्भात, आयआरडीएनं एक एक्सपोजर ड्राफ्ट (Exposure Draft) जारी केला आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई 22 फेब्रुवारी : सध्याच्या काळात आपल्या प्रकृतीमध्ये कधी बिघाड होईल हे अजिबात सांगता येत नाही. अशा परिस्थितीत आपल्याकडे एखादी हेल्थ (Health Insurance) किंवा लाइफ इन्शुरन्स पॉलिसी (Life Insurance Policy) असणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु, घाईघाईनं किंवा योग्य माहितीच्या अभावामुळे एखादी चुकीची पॉलिसी निवडली जाते. त्यामुळे आपल्याला काही समस्यांना तोंडही द्यावं लागतं; मात्र आपण पैशांची गुंतवणूक (Investment) केली असल्यानं ती पॉलिसी अचानक सोडूनही देता येत नाही. अशा नागरिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. तुम्‍ही तुमच्‍या हेल्‍थ किंवा लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समाधानी नसाल, तर ती तुम्ही दुसर्‍या कंपनीकडे पोर्ट (Insurance Policy Port) करू शकता. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीजच्या (Personal Accident Insurance Policy) नूतनीकरणाशी संबंधित काही नियम बदलण्याची योजना आखत आहे. या संदर्भात, आयआरडीएनं एक एक्सपोजर ड्राफ्ट (Exposure Draft) जारी केला आहे. या ड्राफ्टनुसार, पॉलिसीधारकाच्या जोखीम प्रोफाइलमध्ये सुधारणा झाल्यास विमा कंपन्या सूट देऊ शकतील. याशिवाय हेल्थ इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्सशी संबंधित नियमांमध्येही काही बदल करण्याचा प्रस्ताव या एक्सपोजर ड्राफ्टमध्ये ठेवण्यात आला आहे. लाइव्ह हिंदुस्तानने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ड्राफ्टमध्ये प्रस्तावित असलेल्या सुधारणांनुसार, आता कोणतीही इन्शुरन्स कंपनी पॉलिसीधारकाच्या वयाच्या आधारावर दीर्घ कालावधीसाठी पर्सनल अ‍ॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू (Renew) करण्यास नकार देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे इन्शुरन्स पॉलिसी एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट (Port) करण्याचाही प्रस्ताव ड्राफ्टमध्ये ठेवण्यात आला आहे. नवीन इन्शुरन्स कंपनी पॉलिसी होल्डरकडून (Policy Holder) पोर्टेबिलिटी फॉर्म (Portability Form) मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत सध्याच्या इन्शुरन्स कंपनीकडून आवश्यक माहिती घेऊ शकेल. निश्चित केलेल्या कालावधीतच इन्शुरन्स पोर्टेबिलिटी शक्य व्हावी यासाठी हा बदल केला जाणार आहे. पॉलिसीधारकाच्या जोखीम प्रोफाइलमध्ये सुधारणा झाल्यास इन्शुरन्स कंपन्या सवलत देऊ शकतील, असा प्रस्ताव आयआरडीएनं ड्राफ्टमध्ये दिला आहे. ग्राहकांच्या जोखीम प्रोफाइलमध्ये सुधारणा झाल्यास सध्याचे नियम कंपन्यांना नूतनीकरणाच्या वेळी लोडिंग काढून टाकण्याची परवानगी देतात. लोडिंग (Loading) ही उच्च-जोखीम असलेल्या ग्राहकांना प्रीमियम म्हणून आकारली जाणारी अतिरिक्त रक्कम आहे. यापूर्वीच्या नियमांनुसार, प्रवास विमा उत्पादनं, वैयक्तिक अपघात उत्पादनं आणि पायलट उत्पादनं यांचं दीर्घ कालावधीसाठी नूतनीकरण केलं जात नाही. इतर विमा उत्पादनांचं दीर्घ कालावधीसाठी नूतनीकरण केलं जाऊ शकतं. आता आयआरडीएनं दिलेल्या नवीन एक्सपोजर ड्राफ्टमध्ये, वैयक्तिक अपघात उत्पादनंदेखील दीर्घकालीन नूतनीकरणाच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. सिक्युअर नाऊ (SecureNow) या इन्शुरन्स ब्रोकर फर्मचे सह-संस्थापक कपिल मेहता (Kapil Mehta) म्हणतात, की आयआरडीएनं आता विविध बदल सुचवले आहेत. वैयक्तिक अपघात विम्यासाठी दीर्घकालीन नूतनीकरण प्रणाली आणणं, हा पॉलिसीधारकांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाचा प्रस्ताव आहे. पोर्टेबिलिटीशी संबंधित प्रस्तावामुळे विमा कंपन्यांना जुन्या दाव्यांशी संबंधित माहिती मिळू शकणार आहे. पॉलिसीधारकाची तब्येत किंवा इतर परिस्थिती सुधारल्यास कंपन्यांना सवलत देण्यास प्रोत्साहित केलं जाईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात