मुंबई, 23 ऑगस्ट : भारतीय रिझर्व्ह बँकेने देशात रेपो दर वाढवण्याचा निर्णय घेतल्यापासून, सर्व बँका त्यांच्या कर्जदरात सातत्याने वाढ करत आहेत. सोबतच बचत खाते आणि मुदत ठेवींचे दर वाढवत आहेत. जेथे बचत खाते आणि एफडी दर वाढल्यामुळे लोकांना ठेव योजनांवर (Fixed Deposit) जास्त परतावा मिळत आहे. त्याचबरोबर कर्जदारांवर ईएमआयचा बोजाही वाढत आहे. यामुळे लोकांना कार लोन, होम लोन, एज्युकेशन लोन इत्यादी सर्व प्रकारच्या कर्जांवर जास्त व्याजदर भरावा लागतो. कर्जाचे व्याजदर वाढवणाऱ्या बँकांच्या यादीत आता इंडसइंड बँकेचा समावेश झाला आहे. हे नवीन दर 22 ऑगस्ट 2022 पासून लागू झाले आहेत. इंडसइंड बँकेने MCLR दर किती वाढवला? इंडसइंड बँकेने त्याच्या MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट 15 ते 30 बेसिस पॉइंटने वाढवले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला किमान 8.25% MCLR दर भरावा लागेल. त्याच वेळी, त्याची कमाल मर्यादा 9.70% असेल. महागाईतही सोनं, वाहन, प्रॉपर्टी खरेदी वाढण्याचा अंदाज; ‘या’ गोष्टींचा सकारात्मक परिणाम ओव्हरनाईट कर्जासाठी MCLR दर 8.25% आहे, पूर्वी तो 8.10% होता. 1 महिन्याच्या MCLR दर 8.15% ऐवजी 8.30% झाला आहे. 6 महिन्यांचा MCLR दर 8.70% वरून 8.95% झाला आहे. एका वर्षाच्या कर्जासाठी MCLR दर 9% वरून 9.30% पर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, 2 वर्षांचा MCLR दर 9.35% वरून 9.60% पर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, 3 वर्षांचा MCLR दर 9.60% वरून 9.30% झाला आहे. टॅलेंट पाहून आनंद महिंद्रांनी ट्विटरवरच दिली नोकरीची ऑफर; तरुणाने असं केलंय तरी काय? MCLR वाढल्याने कर्ज महाग MCLR दरात वाढ झाल्यानंतर थेट परिणाम ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याजदरांवर होतो. 5 ऑगस्ट 2022 रोजी रिझर्व्ह बँकेने सलग तिसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली. रेपो दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम बँकेच्या कर्जाच्या व्याजदरावर होतो. MCLR नुसार कर्जाचे व्याजदर बँक ठरवतात. इंडसइंड बँकेने अलीकडेच त्यांच्या बचत खात्याच्या व्याजदरातही वाढ केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.