मराठी बातम्या /बातम्या /मनी /पहिल्या तिमाहीत 13.5 टक्क्यांच्या गतीने वाढला भारताचा GDP, पण RBI चा अंदाज चुकला!

पहिल्या तिमाहीत 13.5 टक्क्यांच्या गतीने वाढला भारताचा GDP, पण RBI चा अंदाज चुकला!

India GDP Growth

India GDP Growth

आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच 30 जून 2022 पर्यंतच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये भारताचा जीडीपी (India GDP in first quarter) 13.5 टक्के राहिला, पण आरबीआयने वर्तवलेल्या 16.2 टक्क्यांपेक्षा ही वाढ कमी आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच 30 जून 2022 पर्यंतच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये भारताचा जीडीपी (India GDP in first quarter) 13.5 टक्के राहिला, पण आरबीआयने वर्तवलेल्या 16.2 टक्क्यांपेक्षा ही वाढ कमी आहे. मागच्यावर्षी याच कालावधीमध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर 20.1 टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच एनएसओने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जुलै महिन्याच्या तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने वर्षातली सगळ्यात मोठी वाढ नोंदवली आहे.

मागच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये (डिसेंबर-मार्च) जीडीपीची वाढ 4.1 टक्के होती. जून तिमाहीमध्ये झालेल्या वाढीचं कारण लो बेस आणि आर्थिक उपक्रमांमध्ये आलेली तेजी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

रेटिंग एजन्सी असलेल्या इकराने जीडीपीमध्ये 13 टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज वर्तवला होता, तर एसबीआयच्या रिपोर्टनुसार 15.7 टक्केची वाढ अपेक्षित होती. आरबीआयने या महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या मॉनेटरी कमिटीच्या बैठकीत जीडीपी जवळपास 16.2 टक्क्यांवर राहील, अशी शक्यता वर्तवली होती.

भारताची इकोनॉमी सगळ्यात जलद

13.5 टक्क्यांची वाढ ही अनुमानापेक्षा कमी असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेची ही दुसरी सगळ्यात मोठी वाढ आहे. याआधी मागच्या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपी ग्रोथ 20.1 टक्के होती. त्यामुळे भारत सध्या जगातल्या सगळ्यात जलद वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. चीन जेव्हा त्यांच्या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला पडण्यापासून वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतानाच भारताने पहिल्या तिमाहीमध्ये 13.5 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

पुढच्या तिमाहींमध्ये वेग मंदावणार

अर्थशास्त्रज्ञांच्या मते पुढच्या काही तिमाहींमध्ये भारताच्या आर्थिक वाढीची गती मंदावू शकते, कारण वाढलेल्या व्याजदरांचा फटका बसण्याचा अंदाज आहे. आरबीआयने मे महिन्यापासून रेपो रेटमध्ये 140 पॉईंट्सची वाढ केी आहे, ज्यात महिन्याला 50 पॉईंट्सचा समावेश आहे. पुढच्या महिन्यातही रेपो रेटमध्ये 50 पॉईंट्सच्या वाढीचा अंदाज आहे, त्यानंतर 25 पॉईंट्सची आणखी एक वाढ होऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Gdp, India