मुंबई, 23 जुलै : ब्रिटनची राजधानी लंडन बऱ्याच काळापासून भारतीय करोडपतींचं आवडतं शहर आहे. स्टील किंग लक्ष्मी निवास मित्तल यांच्यापासून ते वेदांताच्या अनिल अग्रवाल या कोट्याधीशांचं लंडनमध्ये घर आहे. यामध्ये आता भारतीय उद्योजक आणि एस्सार ग्रुपचे को-फाऊंडर रवी रुइया यांचं नावही जोडलं गेलं आहे. रुइया यांच्या फॅमिली ऑफिसने लंडनमध्ये जवळपास 1200 कोटी रुपये (11.3 कोटी युरो) मोजून बकिंघम पॅलेसमध्ये आलिशान बंगला घेतला आहे. ही डील लंडनमधली मागच्या काही वर्षांमधली सगळ्यात मोठी प्रॉपर्टी डीलही झाली आहे. हा बंगला रशियाचे मालमत्ता गुंतवणूकदार एण्ड्री गोंचारेंको यांच्याशी जोडला गेला आहे. रुइया यांनी जो बंगला विकत घेतला आहे, त्याचं नाव हनोवर लॉज आहे. हा बंगला लंडनमधल्या 150 पार्क रोडवर आहे. बंगल्याच्या समोर रीजेंट्स पार्कही आहे. लंडनमध्ये महागड्या घरांचं डील बहुतेकवेळा कर्जाशिवायच होतं. नाईट फ्रँक या ब्रोकरेज फर्मने दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी जगातल्या 3 कोटी डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त नेटवर्थ असलेल्या 17 टक्के जणांनी कमीत कमी एक घर विकत घेतलं आहे. कोण आहेत रवी रुइया? रवी रुइया एस्सार ग्रुपचे को-फाऊंडर आहेत. एप्रिल 1949 मध्ये जन्म झालेले रवी मेकॅनिकल इंजिनिअर आहेत, त्यांनी चेन्नईच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून डिग्री मिळवली आहे. रवी यांनी त्यांचं करिअर कुटुंबातल्या व्यवसायातून सुरू केलं आणि आपले मोठे भाऊ शशी रुइया यांना साथ देत कंपनीला नव्या उंचीवर नेलं. दोन्ही भावांनी मिळून एस्सार ग्लोबल फंड लिमिटेड स्थापन केली. एस्सार ग्रुप स्टील, ऑइल ऍण्ड गॅस, पॉवर, कम्युनिकेशन, शिपिंग, प्रोजेक्ट्स ऍण्ड मिनरल्स सेक्टरमध्ये एस्सार ग्रुप 20 पेक्षा जास्त देशांमध्ये काम करतो. 75 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या एस्सार कंपनीचा महसूल 17 अरब डॉलर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.