Home /News /money /

रशियासोबतचा कच्च्या तेलाचा व्यवहार रुपयांमध्ये नाही तर डॉलर्समध्ये होणार, पेट्रोलियम राज्यमंत्र्यांची माहिती

रशियासोबतचा कच्च्या तेलाचा व्यवहार रुपयांमध्ये नाही तर डॉलर्समध्ये होणार, पेट्रोलियम राज्यमंत्र्यांची माहिती

Crude Oil Payment: सूत्रांनी सांगितले की, रशियासोबतचा व्यापार डॉलरमध्ये सेटल केला जात आहे. कारण आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम पाश्चात्य निर्बंधांच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहे.

  नवी दिल्ली, 29 मार्च : रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती भडकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रती बॅरल 100 डॉलरवर गेली आहे. शिवाय, या युद्धामुळे अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध (Economic Restrictions) लादले आहेत. त्यामुळे रशियातील कच्च्या तेलाच्या व्यापारावर याचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. भारतासाठी मात्र, परिस्थिती अनुकूल होताना दिसत आहे. भारतीय तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं (IOC) सवलतीच्या दरात रशियाकडून 30 लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. याचं पेमेंट रुपयांमध्ये केलं जाणार आहे, अशी चर्चा होती. मात्र, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameswar Teli) यांनी यााबाबत माहिती देऊन चर्चेला पूर्णविराम दिला आहे. रशियावर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांचा परिणाम भारत-रशियाच्या कच्च्या तेलाच्या व्यापारावर (Indo-Russian Crude Oil Trade) दिसणार नाही. या कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी रुपयांमध्ये (Rupees) पैसे देण्यासही सरकार बांधील नाही. याशिवाय, सरकारी तेल कंपन्यांनी रशियाकडून खरेदी केलेल्या कच्च्या तेलासाठी रुपयात पेंमेंट करण्याचा विचार नसल्याची माहिती सोमवारी (28 मार्च) संसदेत देण्यात आली. एबीपी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  34 दिवसांपासून सुरु असलेल्या Russia-Ukraine युद्धाचा भारत करणार The End, दिल्लीत निघेल फॉर्म्यूला

  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितलं की, 'सध्या सरकारी तेल कंपन्यांनी कोणताही करार केलेला नाही. याशिवाय रशिया किंवा इतर कोणत्याही देशाकडून भारतीय चलन देऊन कच्चं तेल खरेदी करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नाही.' याबाबत सविस्तर माहिती मात्र, तेली यांनी दिलेली नाही. सूत्रांनी सांगितलं की, आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम (International Payment System) पाश्चात्य निर्बंधांच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे रशियासोबतचा व्यापार डॉलरमध्येच (Dollar) केला जात आहे. अमेरिकेनं इराणवर त्याच्या वादग्रस्त आण्विक कार्यक्रमावर लादलेल्या निर्बंधांनुसार, रशियाबरोबर तेल आणि ऊर्जा व्यापारावर बंदी घातलेली नाही. याचा अर्थ असा आहे की, कोणताही देश किंवा कंपनी रशियाकडून तेल आणि इतर ऊर्जा संसाधनं खरेदी करू शकतो. शिवाय या व्यापारादरम्यान ते आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम वापरण्यासही मोकळे आहेत. इराणच्या बाबतीत असं घडलं नव्हतं. त्यावेळी इराणला आंतरराष्ट्रीय चलन आणि सुरक्षा हस्तांतरण प्रणाली असलेल्या स्विफ्टपासून (SWIFT) विलग करण्यात आलं होतं. तसंच, इराणमधील तेलात गुंतवणूक करणाऱ्या किंवा खरेदी करणाऱ्या कंपन्या आणि संस्थांवर बंदी घालण्यात आली होती. असा छोटा देश ज्याने एकदोन नाही तर 5 कोविड लस केल्या विकसित! गरीब राष्ट्रांना विकल्या स्वस्तात भारत आपल्या एकूण तेल आयातीपैकी (Crude Oil Import) एक टक्का तेल रशियाकडून खरेदी करतो. परंतु, रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियावर पाश्चात्य निर्बंध आले आहेत. परिणामी भारतासमोर तेल आणि नैसर्गिक वायू खरेदीसाठी रुपयांत व्यापार करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. मात्र, भारतानं पूर्वीप्रमाणं डॉलरमध्येच व्यापार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
  First published:

  Tags: Russia Ukraine

  पुढील बातम्या