मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ITR रिफंड क्लेम करताना तुम्हाला येऊ शकते नोटीस?

ITR रिफंड क्लेम करताना तुम्हाला येऊ शकते नोटीस?

आयकर विभागाकडून (Income Tax Department) सध्या परताव्याची छाननी केली जात असून, ज्या करदात्यांची (Tax Payers) टीडीएस (TDS) कपात झाला आहे त्यांना परतावा दिला जात आहे.

मुंबई, 18 ऑगस्ट : आर्थिक वर्षाच्या शेवटी अनेक महत्त्वाची कामे करावी लागतात. त्यापैकी एक म्हणजे आयकर परतावा (Income Tax Returns) भरणं. वेळच्यावेळी इन्कम टॅक्स रिटर्न भरला जात असेल तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. यंदा 31 जुलै ही आयटीआर (ITR) भरण्याची शेवटची तारीख होती. आयकर विभागाकडून (Income Tax Department) सध्या परताव्याची छाननी केली जात असून, ज्या करदात्यांची (Tax Payers) टीडीएस (TDS) कपात झाला आहे त्यांना परतावा दिला जात आहे. अनेक करदात्यांना तो मिळत असला तरी काहींना मात्र आयकर विभागाकडून नोटीस पाठवली जात आहे. कर परताव्यात तफावत आढळल्यास अशी स्थिती उद्भवते. ‘झी न्यूज हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलयं. आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्याची कारणं आयकर कायद्याच्या कलम 80 जी नुसार, (Income Tax Act Section 80G) विविध खर्चांवर कराच्या सवलतीचा फायदा घेता येतो. या कलमान्वये सवलतींसाठी दावा करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना जास्त नोटिसा पाठवल्या जात आहेत. दान दिले जाणारे पैसे, धर्मदाय निधी, मदत निधी हे या कक्षेत येतात. पगारी नोकरदार किंवा व्यापारी वर्गाकडून उत्पन्न आणि कराच्या माहितीत तफावत आढळल्यास आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते. यात काही चूक आढळल्यास 200 टक्क्यांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद कायद्यात आहे. IT नोटीस मिळाल्यास काय करावं? आयकर विभागाकडून नोटीस (IT Notice) मिळाली असल्यास सर्वप्रथम गुंतवणुकीत दाखवलेली कागदपत्रं तपासावीत. याच कागदपत्रांच्या आधारावर नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत आयटीआर पुन्हा एकदा भरावा. तुम्ही नोकरदार असाल तर कंपनीने दिलेल्या फॉर्म 16 मध्ये दाखवलेल्या कपातीसह बेरीज तपासून घ्या. ITR मध्ये दाखवलेली सगळी कपात रक्कम फॉर्म 26 AS मध्ये बरोबर आली आहे ना हे पडताळून पहा. टीडीएसची रक्कम फॉर्म 16 आणि फॉर्म 26 AS मध्ये एकसमान असायला हवी. फॉर्ममध्ये काही तफावत असल्यास कंपनीला ही चूक दुरुस्त करण्यास सांगायला हवं. आर्टिफिशियल इंटिलिजन्सद्वारे सुरू आहे छाननी आयकर विभाग सध्या आर्टिफिशियल इंटिलिजन्सवर (Artificial Intelligence) आधारित एका सॉफ्टवेअरद्वारे कर परताव्याची छाननी करत आहे. याच आधारावर सध्या करदात्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. इन्कम टॅक्स कायद्याच्या वेगवेगळ्या कलमान्वये अनेक क्लेम एकदाच केले असतील तर नोटीस मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत करदात्यांनी ITR ची पडताळणी करून तो पुन्हा भरणं गरजेचं आहे.
First published:

Tags: Income tax, Tax benifits

पुढील बातम्या