जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पगारातील मोठी रक्कम टॅक्समध्ये कट होते? या योजनांमध्ये गुंतवणूक करुन मिळवा करसवलत

पगारातील मोठी रक्कम टॅक्समध्ये कट होते? या योजनांमध्ये गुंतवणूक करुन मिळवा करसवलत

पगारातील मोठी रक्कम टॅक्समध्ये कट होते?

पगारातील मोठी रक्कम टॅक्समध्ये कट होते?

जर तुमच्या पगाराचा मोठा भाग आयकरात जात असेल तर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करावी जिथे तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल, तसेच आयकरातून सवलत मिळेल.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 11 ऑक्टोबर : वार्षिक उत्पन्न करपात्र असेल, तर उत्पन्नाच्या प्रमाणानुसार ठरलेल्या प्रमाणात दर वर्षी आयकर भरावा लागतो. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास नोकरदार वर्गाला कायद्यानुसार आयकरात सवलत मिळू शकते. काही स्मॉल सेव्हिंग स्कीम्स अर्थात छोट्या बचत योजनांविषयी माहिती घेऊ या. यात पीपीएफ, ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग्ज स्कीम, नॅशनल पेन्शन स्कीम यांसारख्या योजनांचा समावेश आहे. आयकर कमीत कमी कसा भरावा लागेल, यासाठी बहुतांश नोकरदार प्रयत्न करत असतात. योग्य ठिकाणी बचत करून तुम्ही चांगला रिटर्न आणि आयकरात सवलत मिळवू शकता. यासाठी तुम्हाला काही खास बचत योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. एनपीएस टिअर-1 खात्याच्या बाबतीत खातेधारकाला आयकर कायदा 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत आणि 80 सीसीडी (1 बी) अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतच्या करसवलतीचा लाभ मिळतो. एनपीएस अकाउंट सुरू करताना सुरुवातीला 500 रुपये भरावे लागतात. या अकाउंटमध्ये वार्षिक किमान 1000 रुपये भरावे लागतात. या अकाउंटमध्ये कमाल योगदानासाठी कोणतीही मर्यादा नाही. एनपीएसअंतर्गत निश्चित दराने रिटर्न मिळत नाही. कारण हे मार्केट लिंक्ड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे. सीनिअर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम अर्थात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत सध्या वर्षाला 7.6 टक्के दराने व्याज मिळतं. या योजनेची मॅच्युरिटी पाच वर्षांची असते. परंतु, तुम्ही आणखी तीन वर्षांपर्यंत ती वाढवू शकता. एका वर्षात व्याजाची रक्कम 50,000 रुपयांवर गेल्यास त्यावर टीडीएस कापला जातो. वाचा - शेअर बायबैकच्या बातम्यांमुळे Infosys च्या शेअर्सचं काय झालं? वाचा कंपनीचा प्लान तुमचं ईपीएफ अकाउंट असेल तर जास्तीत जास्त गुंतवणूक करणं गरजेचं आहे. ईपीएफमध्ये गुंतवणुकीवर चांगलं व्याज मिळतं. सध्या ईपीएफचा व्याजदर 8.1 टक्के आहे. नवीन नियमांनुसार, कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात वार्षिक अडीच लाख रुपयांच्या योगदानावरचं व्याज करमुक्त असेल. तथापि, अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त योगदानावर मिळालेलं व्याज करपात्र असतं. आयकरात सवलत मिळावी यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंडातही बचत करू शकता. ही एक उत्तम टॅक्स सेव्हिंग स्कीम आहे. पीपीएफमध्ये तुम्हाला सध्या 7.1 टक्के व्याजदरानुसार रिटर्न मिळतात. तसंच तीन स्तरांवर करसवलत मिळते. जर या योजनेत वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली, तर आयकर कलम 80 सी अंतर्गत करसवलतीचा लाभ मिळतो. याशिवाय त्यावर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कमही करमुक्त असते. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट किंवा पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट हे एक, दोन, तीन आणि पाच वर्षासाठी असतं. इंडिया पोस्ट वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रत्येकासाठी व्याजदर वेगवेगळा आहे. एक वर्षाच्या डिपॉझिटवर 5.50 टक्के, दोन वर्षांच्या डिपॉझिटवर 5.70 टक्के, तीन वर्षांच्या डिपॉझिटसाठी 5.80 टक्के, तर पाच वर्षांच्या डिपॉझिटसाठी 6.70 टक्के व्याजदर आहे. ही योजना एखाद्या बॅंकेच्या एफडी योजनेसारखी आहे. या योजनेत आयकर कलम 80 सी अंतर्गत केवळ पाच वर्षांत करसवलत मिळते. या योजनेतून मिळणारे रिटर्न करपात्र असतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात