मराठी बातम्या /बातम्या /मनी /करदात्यांसाठी सुरू होणार नवे ई-फायलिंग पोर्टल, क्विक रिफंडसह मिळणार या सुविधा

करदात्यांसाठी सुरू होणार नवे ई-फायलिंग पोर्टल, क्विक रिफंडसह मिळणार या सुविधा

प्राप्तिकर विभाग नवे पोर्टल लवकरच लॉन्च करणार आहे. याच्या माध्यमातून करदात्यांना अनेक सुविधा मिळणार आहेत, प्राप्तिकर विभाग सोमवारी (7 जून 2021) incometax.gov.in हे पोर्टल लॉन्च करेल.

प्राप्तिकर विभाग नवे पोर्टल लवकरच लॉन्च करणार आहे. याच्या माध्यमातून करदात्यांना अनेक सुविधा मिळणार आहेत, प्राप्तिकर विभाग सोमवारी (7 जून 2021) incometax.gov.in हे पोर्टल लॉन्च करेल.

प्राप्तिकर विभाग नवे पोर्टल लवकरच लॉन्च करणार आहे. याच्या माध्यमातून करदात्यांना अनेक सुविधा मिळणार आहेत, प्राप्तिकर विभाग सोमवारी (7 जून 2021) incometax.gov.in हे पोर्टल लॉन्च करेल.

नवी दिल्ली, 07 जून : प्राप्तिकर विभाग नवे पोर्टल लवकरच लॉन्च करणार आहे. याच्या माध्यमातून करदात्यांना अनेक सुविधा मिळणार आहेत, प्राप्तिकर विभाग (7 जून 2021) incometax.gov.in हे पोर्टल लॉन्च करेल. याद्वारे करदात्यांना विविध सुविधा कोणत्याही अडचणी शिवाय मिळू शकतील. जाणून घेऊ पोर्टलविषयी..

करदात्यांना पोर्टलवरून प्राप्तिकर परताव्याची (Income Tax Return) तत्काळ सुविधा मिळेल. पोर्टलवर इंटरॅक्शन आणि अपलोडसारख्या बराच वेळ चालणाऱ्या बाबी एकाच डॅशबोर्डवर दाखवल्या जातील; जेणेकरून, करदाते त्याच वेळी पुढील प्रक्रियाही करू शकतील.

आवश्यक तपशील सहजपणे अपलोड करता येतील

वेतन, गृह-मालमत्ता, व्यवसाय यासह उत्पन्नाची विशिष्ट माहिती प्रदान करण्यासाठी करदात्यांना त्यांचे प्रोफाइल सक्रियपणे अपडेट करता येईल. याचा वापर आयटीआर भरण्यासाठी केला जाईल. डीएस आणि एसएफटी तपशील अपलोड केल्यानंतर वेतन, उत्पन्न, व्याज, लाभांश आणि भांडवली नफा आदी माहिती भरण्यासाठी पूर्व-फाइल करण्याची क्षमता उपलब्ध असेल (अंतिम तारीख 30 जून 2021 आहे).

करदात्यांच्या प्रश्नांना त्वरित प्रतिसाद मिळावा या उद्देशाने करदात्यांना मदत करण्यासाठी नवीन कॉल सेंटर सुरू केले आहे. FAQ ना (नेहमी विचारले जाणारे प्रश्न) तपशीलवार उत्तरे, वापरकर्त्यांसाठी पुस्तिका, व्हिडिओ आणि चॅटबॉट/लाइव्ह एजंट्स या सेवाही दिल्या जातील.

18 जूननंतर नवीन कर भरण्याची प्रणाली सुरू

प्राप्तिकर फॉर्म भरण्याची सुविधा, कर व्यावसायिकांशी संपर्क, चेहराविहीन छाननी करणे किंवा अपीलात नोटिशीला उत्तर सादर करणे या सुविधा उपलब्ध आहेत. नवीन करभरणा प्रणालीचा प्रारंभ 18 जून 2021 रोजी अ‍ॅडव्हान्स टॅक्सच्या हप्त्याच्या तारखेनंतर होईल; जेणेकरून, कोणत्याही करदात्यास गैरसोय होऊ नये, असे स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप लवकरच सुरू होणार

पोर्टलच्या प्रारंभिक लॉन्चिंगनंतर एक मोबाइल अॅपदेखील जारी केले जाईल. करदात्यांना विविध सुविधांबद्दल माहिती देऊन जागरूक करण्यासाठी हे अॅप लॉन्च केले जाणार आहे. हा एक मोठा बदल असल्याने करदात्यांना नवीन प्रणालीशी परिचित होण्यासाठी थोडा वेळ लागू शकेल. यासाठी नवीन पोर्टल सुरू झाल्यावर आणि सर्व वैशिष्ट्ये प्रसिद्ध झाल्यावर सर्व करदात्यांना/भागधारकांना काही काळ धीर धरण्याची विनंतीही प्राप्तिकर विभागाने केली आहे.

First published:

Tags: Income tax, Tax benifits