मुंबई, 18 सप्टेंबर : आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाच स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी लोक अहोरात्र कष्ट घेत असतात. पण, प्रत्येकाला आपल्या कमाईतून लगेच घर घेता येईल अशी परिस्थिती नसते. अशावेळी लोक गृहकर्जाची मदत घेतात. जर तुमच्याबाबतीतही असे होत असेल तर कोणत्याही बँकेकडून गृहकर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला यासाठी कुठे आणि किती खर्च करावा लागेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन तुम्हाला आर्थिक घडी बसवणे सोपं जाईल. प्रोसेसिंग फी ते इतर खर्च गृहकर्जासाठी अर्ज केल्यानंतर, कर्ज मंजूर होईपर्यंत तुम्हाला विविध खर्च करावे लागतात. थोडक्यात सांगायचे तर, तुम्हाला तुमच्या खिशातून प्रक्रिया शुल्क, मुद्रांक शुल्कापासून ते कायदेशीर खर्चापर्यंत पैसे द्यावे लागतील. वास्तविक, प्रत्येक बँका आणि गृहनिर्माण संस्थांचे प्रक्रिया शुल्क वेगवेगळे असते. याशिवाय कर्जासाठी अर्ज करणे आणि मालमत्तेची तपासणी करण्याचा भारही बँका गृहकर्ज घेणाऱ्यावर टाकतात. कर्ज घेताना ही गोष्ट लक्षात ठेवा गृहकर्जासाठी अर्ज करताना एका गोष्टीची विशेष काळजी घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही अर्ज करण्यापूर्वी, अनेक बँकांकडून माहिती गोळा करा आणि तुम्हाला कोणत्या बँकेकडून कर्ज घेणे स्वस्त वाटत आहे ते शोधा. हे करणे आवश्यक आहे. कारण अनेक बँका किंवा गृहनिर्माण संस्था कर्जाचा व्याजदर कमी ठेवतात, परंतु, त्यांची प्रक्रिया शुल्क जास्त असते. या तपासातून संपूर्ण चित्र तुमच्यासमोर येईल. प्रत्येक बँकेसाठी प्रक्रिया शुल्क वेगळे गृहकर्ज देणाऱ्या बँका आणि गृहनिर्माण कंपन्या यासाठी वेगवेगळे प्रक्रिया शुल्क आकारतात. हे कर्जाच्या रकमेच्या दोन टक्क्यांपर्यंत असू शकते. दरम्यान, काही गृहनिर्माण कंपन्या त्यांच्या वतीने गृहकर्जासाठी 10 ते 15 हजार रुपये निश्चित रक्कम आकारतात. काही बँकांमध्ये प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या फक्त 0.5 टक्के आहे. तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, बँकांचे प्रक्रिया शुल्क जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वाचा - Aadhar Cardच्या मदतीने सहज मिळवा पर्सनल लोन; काय आहे प्रोसेस? इतका खर्च करण्यास तयार रहा केवळ प्रक्रिया शुल्कच नाही तर गृहकर्ज घेताना इतरही अनेक खर्च करावे लागतात. उदाहरणार्थ, गृहकर्ज मंजूर करण्यापूर्वी, बँक कायदेशीर खर्च, मालमत्तेची तपासणी, अर्ज करणाऱ्या व्यक्तीची नोकरी यासह इतर तपासण्या करते. बँकांना हा खर्च कर्जदाराकडून दिला जातो. ते थेट वकील किंवा या कामाशी संबंधित व्यक्तीला देण्याचा आग्रहही धरला जातो. याशिवाय कर्ज करारावरील मुद्रांक आणि नोटरी शुल्कही अर्जदारालाच भरावे लागते. प्री-ईएमआयमुळे ओझे वाढते तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करून ते मंजूर होईपर्यंत तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही, पण तुमचे गृहकर्ज मंजूर झाले असले तरी बिल्डरने तुम्हाला घराचा किंवा फ्लॅटचा ताबा दिला नसेल. दुसऱ्या शब्दांत, कर्ज मंजूर झाल्यानंतरही, घराची मालकी मिळण्यास विलंब होतो, अशा परिस्थितीत बँका आणि गृहनिर्माण कंपन्या प्री-ईएमआय आकारतात. यामध्ये हप्त्याची फक्त व्याजाची रक्कम आहे. यासाठी कर्ज देताना बँका अंदाजानुसार ती रक्कम कापून घेतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.