मुंबई, 20 नोव्हेंबर: आजच्या काळात वाढत्या वैद्यकीय महागाईनं लोकांना चिंतेत टाकलं आहे. त्याच वेळी काही रुग्णालये औषधे, उपचार आणि चाचण्या आणि खोलीचे भाडे यासाठी भरमसाठ रक्कम आकारत आहेत. तुमच्या कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चाचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला आता विचार करण्याची गरज आहे. शेवटच्या क्षणी तुमची वर्षांची बचत क्षणार्धात उपचारांच्या खर्चात जाते. हे टाळण्यासाठी देशातील वाढत्या वैद्यकीय खर्चाचे व्यवस्थापन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आरोग्य विमा पॉलिसी घेणे. आरोग्य विमा घेताना कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि वय लक्षात घेऊन काही मुद्यांवर विशेष काळजी घेतली पाहिजे.
भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (CCI) गेल्या सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात असं सांगितलं होतं की, देशातील 12 मोठ्या रुग्णालयांच्या साखळींनी त्यांच्या उपचार आणि इतर सेवांसाठी चुकीच्या पद्धतीनं मनमानी किंमती निश्चित केल्या आहेत आणि या किंमती रुग्णांकडून वसूल केल्या जातात, ज्यामुळं कायद्याचं उल्लंघन होतं. भारताच्या फेअर ट्रेड रेग्युलेटरला चार वर्षांच्या तपासात असं आढळून आलं आहे की, देशातील सर्वात मोठ्या 12 हॉस्पिटल चैननी चिकित्सा सेवा आणि उत्पादनांसाठी अवाजवी किमती ठरवून त्यांच्या वर्चस्वाचा गैरवापर केला आहे.
अशा परिस्थितीत ग्राहक मंचात तक्रार करा-
तुमच्या कुटुंबासह किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसह कोणत्याही रुग्णालयात मनमानी पद्धतीनं पैसे वसूल केले जात असतील, तर ताबडतोब सावध व्हा आणि ग्राहक मंचात तक्रार करा किंवा तुम्ही मेडिकल कौन्सिलमध्येही तक्रार करू शकता. भारतीय स्पर्धा आयोगानं उपचार खर्चासह खोलीच्या भाड्यात जास्त शुल्क घेतल्याबद्दल 3 ते 4 वर्षांसाठी कमाईच्या 10 टक्के पर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.
हेही वाचा: Bank Loan: कर्ज देण्यासाठी बँका लागतील मागे, फक्त अर्ज करताना घ्या ही काळजी
जर हॉस्पिटलच्या खोलीचं भाडं हॉटेलपेक्षा जास्त असेल तर?
भारतीय स्पर्धा आयोगाच्या महासंचालकांना त्यांच्या तपासणीत असं आढळून आलं आहे की दिल्ली एनसीआरमध्ये कार्यरत असलेल्या या हॉस्पिटल चेनमधील 12 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सनी भाड्यानं घेतलेल्या खोल्या, औषधे, वैद्यकीय चाचण्या, वैद्यकीय उपकरणं यासाठी अवास्तव जास्त किमती आकारून त्यांच्या वर्चस्वाचा गैरवापर केला आहे. रुग्णालयाच्या खोलीचं भाडे थ्री स्टार आणि 4 स्टार हॉटेलच्या खोलीच्या भाड्यापेक्षा जास्त असल्याचं अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या गोष्टींची काळजी घ्या-
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Insurance