• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • IDBI बँकेची ग्राहकांसाठी विशेष गुंतवणूक योजना

IDBI बँकेची ग्राहकांसाठी विशेष गुंतवणूक योजना

IDBI बँकेने सिस्टमॅटिक सेव्हिंग्ज प्लॅन (SSP) जाहीर केला आहे. त्याद्वारे ग्राहकांना आपल्या सोयीनुसार बचत करता येते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 एप्रिल : तुम्ही IDBI बँकेचे ग्राहक आहात का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असलं, तर तुम्हाला तुमचे पैसे गुंतवण्याची (Investment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या बँकेने ग्राहकांना मासिक हप्त्यांद्वारे गुंतवणुकीची नवी सुविधा उपलब्ध केली आहे. बँकेच्या ट्विटर हँडलवरून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. IDBI बँकेने सिस्टमॅटिक सेव्हिंग्ज प्लॅन (SSP) जाहीर केला आहे. त्याद्वारे ग्राहकांना आपल्या सोयीनुसार बचत करता येते. दर महिन्याला एका ठराविक रकमेचा हप्ता ग्राहक जमा करू शकतात. ग्राहकाने ठरवलेली रक्कम दर महिन्याला त्याच्या खात्यातून वळती केली जाईल. त्या माध्यमातून ग्राहकांना नियमित बचतीचा लाभ मिळेल. तसंच, सोबत पाच लाख रुपयांची विशेष सुविधाही मिळेल. या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊ या. - IDBI बँकेची SSP प्लस योजना : IDBI बँकेतर्फे ट्विटरवर देण्यात आलेल्या माहितीनुसार या खास सुविधा योजनेत भाग घेणाऱ्या ग्राहकांना दिल्या जातील. - भविष्यातल्या उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्वनियोजित बचतीचं उद्दिष्ट साध्य करता येईल. - निश्चित कालावधीसाठी नियमित बचत करता येईल - एक ते 10 वर्षांपर्यंत पैसे जमा करण्याची सुविधा यात आहे. - किमान 100 रुपयांपासून सुरुवात करता येईल. - एसएसपी प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट प्रोटेक्शन - पाच लाख रुपयांपर्यंतचं कॉम्प्लिमेंट्री इन्शुरन्स कव्हर - 1000पर्यंत रिडीमेबल रिवॉर्ड (Redeemable Reward Points) पॉइंट्स R-Surakshaa: आपल्या कर्मचाऱ्यांसाठी Reliance स्वतःच राबवणार कोरोना लसीकरण मोहीम पाच लाख रुपयांपर्यंतचा पर्सनल अ‍ॅक्सिडेंट इन्शुरन्स (Personal Accident Insurance)  - दर महिन्याला किमान 5000 रुपये आणि 100 रुपयांच्या पटीतल्या रकमेची गुंतवणूक करणं आवश्यक आहे. - किमान तीन वर्षं आणि समाप्त तिमाही; जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत - वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाचं खातं उघडता येतं. SSP ही योजना आवर्ती ठेव योजना अर्थात रिकरिंग डिपॉझिटप्रमाणे (Recurring Deposit) आहे. त्यात वर उल्लेख केलेल्या इन्शुरन्स कव्हर वगैरे फायदे SSP Plus योजनेत आहेत. त्या फायद्यांशिवाय सिस्टमॅटिक सेव्हिंग्ज प्लॅन (SSP) अशी नुसती योजनाही उपलब्ध आहे. अर्ज कसा करायचा? IDBI बँकेच्या सिस्टमॅटिक सेव्हिंग्ज प्लॅनसाठी अर्ज करणं सोपं आहे. इंटरनेट बँकिंग किंवा Go Mobile + अ‍ॅपवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने यासाठी अर्ज करता येतो. ऑनलाइन अर्ज करणं शक्य नसलं, तर बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये जाऊन अर्ज करता येतो.
  First published: