वाहन उद्योग क्षेत्रावर मंदीचं सावट असून त्यातच बीएस 6 च्या घोषणेनंतर कंपन्यांनी जुन्या कार विकण्यास सुरुवात केली आहे. या कारवर मोठ्या प्रमाणावर सूट दिली जात आहे. मारुती कंपनीनं दिलेल्या ऑफरनंतर आता ह्यूंडाईनेसुद्धा ग्राहकांना दोन लाख रुपयांपर्यंत सूट दिली आहे.
Xcent या कारवर 95 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या कारची किंमत 5 लाख 81 हजार रुपयांपासून आहे. पेट्रोल आणि डीझेल दोन्ही कारवर सूट देण्यात येत आहे.
Santro ह्यूंडाईच्या सर्वात स्वस्त कारपैकी एक असलेल्या या कारवर 40 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या कारची किंमत 3.90 लाख रुपयांपासून आहे.
कंपनीने एलीट i20 वर 45 हजार आणि i20 अॅक्टिव्ह वर 25 हजार रुपयांची सूट दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या कारवर ही ऑफर आहे. एलीट i20 ची किंमत 5.53 लाख तर i20 अॅक्टिवची किंमत 7.74 लाख इतकी आहे.
Grand i10 कारवर 95 हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. पेट्रोल आणि डीझेलच्या दोन्ही कारवर ही ऑफर असून गाडीची किंमत 4.98 लाख रुपये असेल.
एसयुव्ही रेंजमधील Creta या कारवर 50 हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. याची सुरुवातीची किंमत 10 लाख रुपये इतकी आहे.
ह्डूंडाईच्या Verna कारवर 60 हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. या कारची किंमत 8.18 लाख रुपये आहे. पेट्रोल आणि डीझेलच्या कारवर हा डिस्काउंट उपलब्ध आहे.
Tucson कारवर तब्बल 2 लाख रुपयांची सूट देण्यात येत आहे. या कारची किंमत 18.77 लाख रुपये असून पेट्रोल आणि डीझेल या दोन्ही कारवर सूट मिळणार आहे.
याशिवाय Elantra सुद्धा ऑफरमध्ये मिळत असून या कारच्या खरेदीवर 2 लाख रुपयांची सूट आहे. 13.82 लाख रुपये किंमतीची पेट्रोल आणि डीझेल कार या ऑफरमध्ये खरेदी करता येईल.
यामध्ये एक्सचेंज बोनस, कॅश डिस्काउंट, कार्पोरेट डिस्काउंटच्या ऑफर्स आहेत. शहर, डीलरशिप, गाड्या यानुसार वेगवेगळा डिस्काउंट असू शकतो. नेमकी सूट किती मिळेल यांची अधिकृत माहिती डीलरकडून मिळू शकेल.