मराठी बातम्या /बातम्या /मनी /Video : या व्यक्तीने खरेदी केली देशातील सर्वात महागडी कार; किंमत वाचून येईल भोवळ

Video : या व्यक्तीने खरेदी केली देशातील सर्वात महागडी कार; किंमत वाचून येईल भोवळ

देशातील सर्वात महागडी कार

देशातील सर्वात महागडी कार

हैदराबादमधील एका व्यावसायिकाने एक अतिशय महागडी कार खरेदी केली आहे. याला भारतातील सर्वात महागडी कार म्हटले जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

हैदराबाद, 16 डिसेंबर : हौसेला मोल नाही असं म्हणतात. आपली हौस पुरवण्यासाठी लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात. तर आपण किती अलिशान आयुष्य जगतो हे दाखवण्यासाठी देखील लोक महागड्या गोष्टी खरेदी करत असतात. हैदराबादमधील एका व्यावसायिकाने देशातील सर्वात महागडी कार खरेदी केली आहे. नसीर खान असे या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याने नुकतीच मॅक्लारेन 765 LT स्पायडर कार खरेदी केली आहे. त्याने कारच्या डिलिव्हरीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्याला इंस्टाग्रामवर आतापर्यंत सुमारे 1 लाख 60 हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

Cartoq.com नुसार नसीर खानच्या McLaren 765 LT Spider ची किंमत जवळपास 12 कोटी रुपये आहे. अहवालानुसार नसीर हा या कारचा भारतातील पहिला ग्राहक असू शकतो. हैदराबादमधील प्रसिद्ध ताज फलकनुमा पॅलेसमध्ये नसीरला कारची डिलिव्हरी मिळाली आहे.

कारसोबतचा व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना नसीरने लिहिले - MCLAREN 765LT SPIDER मध्ये आपले स्वागत आहे. ही सुंदर कार घेण्यासाठी किती आलिशान ठिकाण आहे. व्हिडिओमध्ये नसीर कार उघडताना दिसत आहे. कार MSO वोल्केनो रेड शेड कलरमध्ये आहे.

रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की 765 LT स्पायडर व्हेरिएंट ही मॅक्लारेनची सर्वात वेगवान कार आहे. या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे याचे छत अवघ्या 11 सेकंदात उघडते. या कारमध्ये 4.0 लीटर ट्विन टर्बोचार्ज्ड V8 पेट्रोल इंजिन आहे. कारचे इंजिन 765 Ps पॉवर जनरेट करते. या कारचा पीक टॉर्क 800 Nm आहे.

अलिशान कारचे कलेक्शन

नसीर खान सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहेत. नसीरचे इंस्टाग्रामवर सुमारे 4 लाख फॉलोअर्स आहेत. तो इन्स्टाग्रामवर स्वत:ला कार कलेक्टर आणि उद्योजक म्हणून सांगतो. महागड्या कारचे फोटो आणि व्हिडिओही तो शेअर करत असतो. नसीर खान यांच्याकडे कारचे मोठे कलेक्शन आहे. इंस्टाग्रामवर, तो रोल्स रॉयस कुलिनन ब्लॅक बॅज, फेरारी 812 सुपरफास्ट, मर्सिडीज-बेंझ जी350डी, फोर्ड मस्टॅंग, लॅम्बोर्गिनी एव्हेंटाडोर, लॅम्बोर्गिनी उरूस यांसारख्या महागड्या कारसह त्याचे फोटो पोस्ट करत असतो. या सगळ्याशिवाय त्याच्याकडे आणखी महागड्या गाड्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Car, Hyderabad