मुंबई : सध्याच्या काळात बचतीसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. सेवानिवृत्तीनंतरचं जीवन, मुला-मुलींचं शिक्षण, विवाह, घरखरेदी आदी गोष्टी विचारात घेऊन बरेच जण बचत आणि आर्थिक नियोजन करतात. आपल्या पाल्याला उच्च शिक्षण मिळावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते.
केवळ या कारणासाठी काही जण बचतीवर भर देतात. त्यासाठी पालक काही बचत योजनांमध्ये आपल्या मुलांची खाती उघडतात.
लहान लहान बचत योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांना कोणत्याही जोखमीशिवाय व्याजाचा लाभ मिळतो.
यासोबतच करात सूट आणि इतर फायदेही दिले जातात. लहान बचत योजनेंतर्गत अकाउंट बँक व पोस्ट ऑफिसमध्ये दोन्ही ठिकाणी उघडले जाऊ शकते, परंतु जर तुम्हाला खातं बँकेतून पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करायचं असेल किंवा पोस्ट ऑफिसमधून बँकेत ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्ही हे सहज करू शकता.
PPF खातेधारकाचा मृत्यू झाल्यावर कसे क्लेम करावेत पैसे? जाणून घ्या डिटेल्स
सीनिअर सिटीझन सेव्हिंग, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत उघडलेले खाते पोस्ट ऑफिसमधून बँकेत आणि पोस्ट ऑफिसच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करता येते. जर तुम्हालाही हे करायचे असेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे, ते जाणून घेऊयात.
सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम ट्रान्सफर कशी करायची
ही योजना बँकेतून पोस्ट ऑफिस आणि पोस्ट ऑफिसमधून बँकेत ट्रान्सफर केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला संपूर्ण पत्त्यासह ट्रान्सफर फॉर्म भरून तो सबमिट करावा लागेल. तसेच पासबुकची कॉपी आणि 100 रुपये जीएसटीसोबत जमा करावे लागतील.
PPF, सुकन्या समृद्धी योजनेचं खातं पोस्ट ऑफिसमधून बँकेत ट्रान्सफर कसं करायचं?
PPF अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी चार्जेस
याच प्रक्रियेचा वापर करून तुम्ही पीपीएफ अकाउंटही ट्रान्सफर करू शकता. हे पोस्ट ऑफिसमधून बँकेत किंवा बँकेतून पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करता येते. यासाठी बँका आणि पोस्ट ऑफिस तुमच्याकडून १०० रुपये + जीएसटी आकारू शकतात.
सुकन्या समृद्धी अकाउंट ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया
सुकन्या समृद्धी अकाउंट बँकेतून पोस्ट ऑफिस आणि पोस्ट ऑफिसमधून बँकेत ट्रान्सफर करण्यासाठी, तुम्हाला 100 रुपये + GST शुल्क भरावे लागेल. यासोबतच इतर योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल तर ते अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी पासबुक आणि पत्त्यासह ट्रान्सफर फॉर्म भरून बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा लागतो.
अशा रितीने तुम्ही तुमचे अकाउंट बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून दुसरीकडे ट्रान्सफर करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Open nps account, Open ppf account, PPF