मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PF पासून ते LPG गॅस बुकींगपर्यंत तुमच्या भरपूर उपयोगाचं आहे Umang अ‍ॅप

PF पासून ते LPG गॅस बुकींगपर्यंत तुमच्या भरपूर उपयोगाचं आहे Umang अ‍ॅप

 उमंग अ‍ॅपद्वारे आपण एकाच ठिकाणी 21,499 प्रकारच्या सरकारी आणि इतर उपयुक्त सेवा वापरू शकतो. हे अ‍ॅप Android, iOS आणि इतर सर्व वेब ब्राउझर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

    नवी दिल्ली, 06 जून : उमंग अ‍ॅप हे अनेक सेवा देणारं एक अतिशय उपयुक्त अ‍ॅप आहे. वास्तविक या मोबाइल अ‍ॅपमध्ये तुम्हाला भविष्य निर्वाह निधी (पीएफ), डिजीलॉकर (DigiLocker), एनपीएस, एलपीजी सिलिंडर बुकिंग (Gas Booking), पॅन कार्ड, युटिलिटी बिल इत्यादी संबंधित सेवा मिळतात. उमंग अ‍ॅपद्वारे आपण एकाच ठिकाणी 21,499 प्रकारच्या सरकारी आणि इतर उपयुक्त सेवा वापरू शकतो. हे अ‍ॅप Android, iOS आणि इतर सर्व वेब ब्राउझर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि राष्ट्रीय ई-शासन विभाग (NeGD) यांनी विकसित केले आहे. उमंग अ‍ॅप डाउनलोड कसे कराल अँड्रॉइड फोन वापरकर्ते हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरून आणि आयफोन वापरकर्ते अ‍ॅप स्टोअरवरून सहज डाउनलोड करू शकतात. सर्वात सोपा पर्याय म्हणजे या 9718397183  नंबरवर मिस कॉल करून अ‍ॅपची लिंक मिळवू शकता. याशिवाय https://web.umang.gov.in या साईटवर जावून अ‍ॅप डाउनलोड करता येते. उमंगच्या मदतीनं घर बसल्या बर्‍याच गोष्टी करू शकता विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी बऱ्याच प्रकारचे अ‍ॅप्स डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. उमंग अॅप डाउनलोड केल्यानंतर विविध ऑनलाईन सुविधा या एकाच अ‍ॅपमध्ये मिळतात. या अ‍ॅपच्या साहाय्याने आपण भविष्य निर्वाह निधी (पीएफ), डिजीलोकर, एनपीएस, गॅस सिलिंडरचे बुकिंग, पॅनकार्ड, युटिलिटी बिले इत्यादींशी संबंधित सेवा सहज करू शकतो. एलपीजी सिलिंडर बुकिंग उमंग अ‍ॅपच्या मदतीनं आपण भारत गॅस, इंडेन आणि एचपी गॅससह सर्व कंपन्यांचे गॅस सिलिंडर बुक करू शकता. त्यासाठी आपल्याला एजन्सीमध्ये फोन करून नंबर लावण्याची आवश्यकता नाही. त्याचे ऑनलाईन पेमेंटही करता येते. तसेच पीएफ खातेधारकांसाठी उमंग अ‍ॅप खूप उपयुक्त आहे. पीएफ खातेधारक त्यांची खात्यासंदर्भातील विविध कामं उमंग अ‍ॅपद्वारे काही सेकंदात करू शकतात. अ‍ॅपवर पीएफशी संबंधित 10 पेक्षा जास्त प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्हाला पीएफ बॅलन्स अगदी सहजपणे कळू शकेल. 10 सी फॉर्म, पासबुक, क्लेम राईज, ट्रॅक क्लेम, यूएएन अ‍ॅक्टिवेशन इत्यादी गोष्टी या अ‍ॅपद्वारे करता येतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Apps, Government apps

    पुढील बातम्या