जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Post Office Franchise: पोस्ट ऑफिसचीच्या फ्रॅन्चायजीमधून करा चांगली कमाई; कोण करु शकतात अर्ज?

Post Office Franchise: पोस्ट ऑफिसचीच्या फ्रॅन्चायजीमधून करा चांगली कमाई; कोण करु शकतात अर्ज?

Post Office Franchise: पोस्ट ऑफिसचीच्या फ्रॅन्चायजीमधून करा चांगली कमाई; कोण करु शकतात अर्ज?

पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपयांची गरज आहे. पोस्ट ऑफिसच्या फ्रँचायजी आउटलेट आणि पोस्टल आउटलेट दोन प्रकारच्या असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 सप्टेंबर : पोस्ट ऑफिसच्या विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजना सर्वसामान्यांमध्ये बऱ्याच लोकप्रिय आहेत. गुंतवणुकीबरोबरच पोस्ट ऑफिसच्या फ्रँचायजीच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचा एक उत्तम मार्ग सापडू शकतो. अगदी थोडी गुंतवणूक करून तुम्ही पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी सुरु करू शकता. पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपयांची गरज आहे. पोस्ट ऑफिसच्या फ्रँचायजी दोन प्रकारच्या असतात- फ्रँचायजी आउटलेट (Franchise Outlet) आणि पोस्टल आउटलेट (Postal Outlet). फ्रँचायजी सुरु करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमधून फॉर्म घेऊन अर्ज करू शकता. कोण सुरु करु शकतं फ्रॅचायजी? » फ्रँचायजी घेणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावं. » भारताचा कोणीही नागरिक पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेऊ शकतो. » कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. नोंदणीकृत वस्तूंच्या बुकिंगसाठी, प्रत्येक व्यवहारामागे 3 रुपये कमिशन निश्चित करण्यात आलं आहे. स्पीड पोस्ट बुकिंगसाठी प्रतिदेवाण-घेवाण 5 रुपये कमिशन मिळतं. मनी ऑर्डरसाठीही कमिशन देण्यात येतं. 100 ते 200 रुपयांदरम्यानच्या मनी ऑर्डरसाठी साडेतीन रुपये कमिशन मिळतं. 200 रुपयांवरील मनी ऑर्डरसाठी प्रतिव्यवहार 5 रुपये कमिशन दिलं जातं. फ्रँचायजी एजंट 100 रुपयांपेक्षा कमी मनी ऑर्डर बुक करू शकत नाही. मनी ऑर्डरसाठी कमीतकमी मर्यादा 100 रुपये आहे. 1000 नोंदणीकृत आणि स्पीड पोस्टच्या बुकिंगचं मासिक लक्ष्य पूर्ण केल्यास 20 टक्के अतिरिक्त कमिशन दिलं जातं. पोस्टाची तिकीटं आणि स्टेशनरी विक्रीवर जेवढी विक्री झाली आहे त्या रकमेच्या 5 टक्के कमिशन निश्चित करण्यात आलं आहे. महसुली शिक्के, केंद्रीय भर्ती शुल्क तिकीटं इ.च्या विक्रीसह किरकोळ सेवांसाठी मिळालेल्या उत्पन्नाच्या 40 टक्के कमिशन पोस्ट ऑफिसद्वारा निश्चित केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात