मुंबई, 19 मे : जेव्हा पैशांची बचत करायचा मुद्दा येतो, तेव्हा आपण नेहमीचेच मुलभूत पर्याय निवडणं पसंत करतो. यामध्ये एफडी (Fixed Deposit)), पेन्शन योजना(Pension Scheme), विमा(insurance) किंवा म्युच्युअल फंड (mutual fund) येतात. 2020 या वर्षाचा अनुभव हा आपल्या सर्वांसाठी वेगळा होता. या वर्षाने गुंतवणूकदारांना पैशाच्या जोखमेपासून वाचवण्यासाठी उपाययोजना करून स्थिर उत्पन्न कसे मिळवायचे हे शिकवले. सध्या ज्याप्रकारे व्याज दरात घसरण होत आहे आणि फायनान्शिअल असेटचे व्हॅल्यूएशन झपाट्याने बदलत आहे, ते पाहता तुम्हीही नक्कीच कॅपिटल मार्केटमधील उतार-चढावांपासून सुरक्षित, असा गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल. असे पर्याय शोधत असताना कोणत्याही प्रकारचे आमीष देणाऱ्या योजनेपासून लांब राहाणं ही खरी कसोटी असते. कारण क्रॅश अँड बर्नच्या नादात नुकसान होऊ शकते. त्यामुळे नीट माहिती घेऊन गुंतवणुकाचा योग्य पर्याय शोधायला हवा, जो ठराविक काळानंतर स्थिर रिटर्न देईल.
चला जाणून घेऊया गुंतवणूक कुठे करायची?
1.एखादा बिझनेसची खरेदी करणे
बिझनेसची खरेदी करणं हा सगळ्यात जुना आणि गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय आहे. अनेक कोट्याधीशांनी बिझनेस करूनच पैसे कमवले आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही बिझनेस खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्याचा सुरुवातीचा सेटअप करावा लागत नाही. तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा तयार बिझनेस मिळतो, त्यामुळे तुम्हाला केवळ उत्पन्न वाढवण्यावर भर द्यावा लागतो. कोरोनामुळे बिझनेस विकणाऱ्या अनेक वेबसाईट्सवर डील आणि बिझनेस विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. यापैकी बऱ्याच ऑफर्स या बाजारातील अनिश्चितेमुळे आहेत. त्यामुळे एखादा समजदार गुंतवणूकदार संधी ओळखून स्वस्तात बिझनेस खरेदी करून चांगला नफा कमवू शकतो. SMERGERS, BizBuySell आणि BusinessForSale यासारखे ऑनलाइन प्लॅटफॉर्म बिझनेस खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या बजेट आणि गरेजनुसार चांगले पर्याय निवडण्यात मदत करतात.
2. पी2पी प्लॅटफॉर्मची मदत घेणं
फायनेन्शिअल मार्केटच्या (Financial Market) काही अडचणी आहेत. मोठ्या बिझनेसच्या तुलनेत छोट्या बिझनेससाठी लोन मिळवण्यात खूप अडचणी येतात. तसेच त्यासाठी मोठी आणि किचकट प्रक्रिया असते, अर्ज रिजेक्ट होण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे छोटा बिझनेस सुरू करणारे लोक आजकाल पी2पी प्लॅटफॉर्मच्या मदतीने बँकेशिवाय पीयर-टू-पीयर लेंडर्सपासून पैसे घेतात. यामध्ये लोन काही महिने किंवा काही वर्षाच्या कमी कालावधीसाठी असते आणि ठरलेल्या वेळेत ते परत फेडायचे असतात. रिसर्चनुसार, येत्या काळात पी2पी लेंडींगमध्ये 10 टक्क्यांची वाढ होऊ शकते. यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात फंड बॉक्स (Fund box) सारखी वेबसाईट आणि फंडीग सोसायटी काम करत आहे. भारतातही परवानाधारक Rupee Circle, Faircent सारखे पर्याय उपलब्ध आहेत.
3.फ्रेंचायझीखरेदी करणे
फ्रेन्चायझिंग गुंतवणूक (Investment in franchise) करण्यासाठीचे एक लोकप्रिय माध्यम बनतंय. याच्या माध्यमातून गुंतवणूकदार कमी जोखमीने व्यापार सुरू करू शकतो. फ्रेंचायझीच्या व्यवसायात एक नावाजलेला ब्रँड असतो, याशिवाय फ्रेंचायझी पार्टनर मार्केटिंग, ट्रेनिंग, हायरिंग आणि ऑपरेशनल गाइडलाइन्ससाठी फ्रेंचायझरची मदत घेऊ शकतो. ज्यांना महिन्याच्या पगाराशिवाय अतिरिक्त पैसे कमवायचे आहेत, अशा नोकरदारांसाठी हा फॉर्मेट उत्तम आहे. तुमच्या आवडीचे ब्रँड निवडण्यासाठी तुम्ही Franchise Direct, SMERGERS, Franchise India या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता.
4.को-ओनरशिप असलेल्या CRE मध्ये गंतवणूक करणे -
बऱ्याच रिटेल गुंतवणूकदारांना रेसिडेंशियल प्रॉपर्टीज आणि रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट चांगल्या वाटतात. त्यामध्ये अपार्टमेंट आणि प्लॉट हे लोकप्रिय पर्याय होते. मात्र, गेल्या काही वर्षात या क्षेत्राची चमक गेली असून कोरोनाकाळात तर परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र, कमर्शियल रियल एस्टेट (सीआरई)नेहमीच एचएनआयचा लोकप्रिय एसेट क्लास राहिला आहे. ही प्रॉपर्टी,दर महिन्याला नफा मिळवून देण्यासह महिन्याला भाडं देखील देते. मॅनेजमेंटचा खर्च काढून 7-10 टक्के वाढ देते. सध्या को-ओनरशिप वाले प्लॅटफॉर्मज PropShare, Strata हे गुंतवणूकदारांना एकमेकांशी जोडतात. जे कमीत कमी 25 लाख रुपयांच्या तिकीट साईझमध्ये गुंतवणूक करून प्रिमिअम ऑफिस आणि कमर्शियल प्रॉपर्टी स्पेस खरेदी करू शकतात. भारतात आरईआयटीच्या माध्यमातून कोणीही 50 हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकतं.
5.स्टार्टअपमध्ये गुंतवणूक
स्टार्टअप बिझनेस (Startups) करण्याचा नवीनमार्ग आहे. विचार, जिद्द, हिमतीच्या आधारे बिझनेस वाढवला जातो. यासाठी सुरुवातीला गुंतवणूकदारांकडून बिझनेससाठी रक्कम एकत्र केली जाते. मात्र, कालांतराने हा स्टार्ट अप अरब डॉलरची कंपनीदेखील बनू शकते. एका आकडेवारीनुसार, 98 टक्के स्टार्ट अप फेल होतात. त्यामुळे गुंतवणूकदाराला गूंतवलेली रक्कम गमावण्यास तयार राहायला पाहिजे. यशस्वी झाल्यास स्टार्ट अपमध्ये पैसे गुंतवणारे अनेक जण गुंतवणुकीवर 30-40 पट कमवतात. आतापर्यंत 500 पेक्षा जास्त स्टार्ट-अप यशस्वी राहिलेत. यामध्ये अमेरिका, चीन, ब्रिटन आणि भारताच्या स्टार्टअपचा समावेश आहे. मान्यता प्राप्त गुंतवणूकदार, हायग्रोथ पोटेंशियल आणि पेटेंट, चांगला कस्टमर बेस असणारे स्टार्ट-अप शोधण्यासाठी आणि त्यात गुंतवणूक करण्यासाठी AngelList, Lets Venture, Tracxn यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर तुम्ही करू शकता.
6.क्रिप्टो करेंसीचीखरेदी करणे
हा पर्याय जोखमीचा आणि नफ्याचा आहे. एकीकडे एलॉन मस्कसारख्या अब्जाधिशांनी क्रिप्टोला चांगलं भविष्य असल्याचं मानून रियल वर्ल्ड प्रॉडक्टसाठी क्रिप्टो करन्सीचं (Cryptocurrency) पेमेंट स्विकारणं सुरू केलंय. तर दुसरी अनेक श्रीमंत लोक याला स्कॅम मानतात. मात्र, अनेक गुंतवणूकदार यात पैसे गुंतवून श्रीमंत झाले आहेत. तुम्ही Coinbase, Binance यासारखे ऍप्स तसेच भारतातील CoinSwitch Kuber, CoinDCX, WazirX या ऍप्सच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता. ज्यांना क्रिप्टो वॉलेट उघडायचे नसेल त्यांच्यासाठी BTTC, EBIT, ETF यासारखे पर्याय आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money