जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Fake PAN Card: बनावट PAN Card असं ओळखा; या सोप्या स्टेप्स फॉलो करून घरबसल्या जाणून घ्या

Fake PAN Card: बनावट PAN Card असं ओळखा; या सोप्या स्टेप्स फॉलो करून घरबसल्या जाणून घ्या

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर e-PAN Card डाउनलोड करू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे पॅन कार्डची PDF फाइल पासवर्डने सुरक्षित असेल. हा पासवर्ड तुमची जन्मतारीख असेल.

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर e-PAN Card डाउनलोड करू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे पॅन कार्डची PDF फाइल पासवर्डने सुरक्षित असेल. हा पासवर्ड तुमची जन्मतारीख असेल.

सरकारी योजनांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं आवश्यक झालं आहे. या दरम्यान आता बनावट पॅनकार्डचाही उलगडा होऊ लागला आहे, त्याविषयी काही महत्त्वाची माहिती (Fake PAN Card Number) जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 जानेवारी : आपण डिजिटल होत जात आहोत, तसेच फसवणुकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अलिकडे बनावट पॅन कार्डबाबत अनेक प्रकरणे समोर येत आहेत. वास्तविक, सरकारी योजनांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं आवश्यक झालं आहे. या दरम्यान आता बनावट पॅनकार्डचाही उलगडा होऊ लागला आहे, त्याविषयी काही महत्त्वाची माहिती (Fake PAN Card Number) जाणून घेऊया. बनावट पॅन कार्ड समोर येत असल्याने आता कर विभागाने पॅन कार्ड आयडीमध्ये क्यूआर कोड जोडण्यास सुरुवात केली आहे. आता नवीन पॅन कार्ड तयार केली जात आहेत, त्यामध्ये QR कोड एम्बेड केला आहे. हा क्यूआर कोड पॅनकार्ड बनावट आहे की खरे आहे हे ओळखतो. स्मार्टफोन आणि प्राप्तिकर विभागाच्या अॅपच्या मदतीने तुम्ही पॅन कार्डची सत्यता जाणून घेऊ शकता. पॅन कार्ड खरं की बनावट असं ओळखा यासाठी तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जावं लागेल. www.incometax.gov.in/iec/foportal वर क्लिक करा. तुम्हाला डावीकडील Verify your PAN च्या लिंकवर क्लिक करावे लागेल. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला पॅन कार्डची संपूर्ण माहिती भरावी लागेल. येथे पॅन क्रमांक, पूर्ण नाव, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक टाका. माहिती भरल्यानंतर, पोर्टलवर एक संदेश येईल की माहिती पॅन कार्डशी जुळते की नाही. अशा प्रकारे तुम्ही पॅन कार्डचे सत्यता सहज शोधू शकता. हे वाचा -  लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात पॅन कार्ड आवश्यक पॅनकार्ड हे सरकारी कागदपत्र आहे. बँकिंग किंवा इतर वित्तसंबंधित कामांमध्ये त्याची आवश्यकता असते. 10 अंकी पॅन कार्डद्वारे तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. बँक खाते उघडणे, मालमत्ता खरेदी करणे किंवा विकणे, वाहन खरेदी करणे किंवा विक्री करणे, आयटीआर दाखल करणे, 2 लाख रुपयांपेक्षा जास्त दागिने खरेदी करणे यासह अशी अनेक कामे आहेत, ज्यामध्ये पॅन कार्ड आवश्यक आहे. हे वाचा -  Kidney Care Tips: किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरतात या 5 गोष्टी; आहारातील प्रमाण असावं मर्यादितच पॅन कार्डसोबत आधार लिंक करणे - सर्व प्रथम www.incometaxgov.in वर जा. येथे Our Service वर क्लिक केल्यानंतर Link Aadhaar चा पर्याय येईल. आता Link Aadhaar Know About Aadhaar Pan Linking Status या पर्यायावर जा. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. या पृष्ठावर तुमचा पॅन आणि आधार कार्ड तपशील प्रविष्ट करा. संपूर्ण माहिती दिल्यानंतर ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा. यानंतर, तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे पाहू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात