मराठी बातम्या /बातम्या /मनी /

घरबसल्या फक्त 2 मिनिटांत असं करा Paytm साठी KYC

घरबसल्या फक्त 2 मिनिटांत असं करा Paytm साठी KYC

तुम्ही घरबसल्या लगेच आताच दोन मिनिटांत पेटीएमचं KYC पूर्ण करू शकता.

तुम्ही घरबसल्या लगेच आताच दोन मिनिटांत पेटीएमचं KYC पूर्ण करू शकता.

तुम्ही घरबसल्या लगेच आताच दोन मिनिटांत पेटीएमचं KYC पूर्ण करू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : डिजिटल व्यवहारांसाठी पेटीएमचा वापर अनेक जण करत आहेत. पेटीएमला हॅकर्सने टार्गेट केलं असून KYC साठी फसवणूक करणारे फोन येत आहे. या सगळ्याची कटकट नको असेल तर तुम्ही घरबसल्या लगेच आताच दोन मिनिटांत पेटीएमचं KYC पूर्ण करू शकता.

बाजारातील भाजीविक्रेत्यांपासून कपडे, किराणा मालापर्यंत सर्वच प्रकारचे व्यापारी डिजिटल पेमेंट घेतात. याशिवाय युजर्स याचा वापर वीज, पाणी बिल, ऑनलाईन शॉपिंग, तिकीट बुकिंग आणि घरी बसून रिचार्ज करण्यासाठी करतात. अशावेळी KYC नाही म्हणून कुठेही काम अडू नये. त्यामुळे तुम्ही आजच लगेच KYC चं काम पूर्ण करून टाका.

पेमेंट आणि बिल भरण्यासाठी पेटीएमवर KYC बंधनकारक आहे. फसवणूक आणि खोटी ओळख दाखवून पैसे उकळणाऱ्यांना चाप लावण्यासाठी हा नवीन नियम काढला आहे. याशिवाय पेटीएम डिफॉल्टर्स देखील ट्रेस करतो. ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन KYC बंधनकारक केलं आहे.

पेटीएम खात्यावर कसं लिंक करायचं आधार कार्ड

तुमच्या मोबाईलवर paytm app सुरू करा

डाव्या बाजूला वरच्या बाजूला प्रोफाइल पर्याय असेल तिथे जाऊन टॅप करा.

प्रोफाइलची निवड करा आणि तिथे स्क्रोल डाऊन करा

तिथे तुम्हाला आधार कार्डचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा

तुमचा 12 डिजिट आधार कार्ड नंबर अपलोड करा

साधारण 48 तासांत आधार कार्ड तुमच्या पेटीएम खात्याला लिंक होईल. त्यानंतर तुम्हाला उरलेलं KYC पूर्ण करायचं आहे.

वीडियो केवाईसी करण्याची पद्धत जाणून घेऊया.

व्हिडीओ कॉलद्वारे तुम्ही KYC करू शकता, व्हिडिओ केवायसी सुरू करण्यासाठी आपले आधार कार्डचे तपशील अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठविला जाईल. एकदा आधारची पडताळणी झाली की, तुम्हाला मागितलेले तपशील - पालकांची नावे, कायम आणि सध्याचे पत्ते, व्यवसाय, वैवाहिक माहिती द्यावी लागणार आहे.

यानंतर व्हिडिओ व्हेरिफिकेशन सुरू होईल. पेटीएमचे अधिकारी आपल्याबद्दल काही तपशील विचारू शकतात जसे की जन्मतारीख, सध्याचे वास्तव्य इत्यादी. व्हिडिओ व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला पॅन कार्ड घेऊन तयार राहावं लागतं, जिथे तुम्हाला तुमचं पॅन कार्ड धरून कॅमेऱ्यासमोर यावं लागतं. या काळात पॅनकार्डचा पुढचा भाग कॅमेऱ्यासमोर असायला हवा.

First published:

Tags: Paytm, Paytm Money, Paytm offers