मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI ग्राहक आता WhatsApp द्वारे चेक करू शकतात खात्यातील रक्कम, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

SBI ग्राहक आता WhatsApp द्वारे चेक करू शकतात खात्यातील रक्कम, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

SBI ग्राहक आता WhatsApp द्वारे चेक करू शकतात  खात्यातील रक्कम, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

SBI ग्राहक आता WhatsApp द्वारे चेक करू शकतात खात्यातील रक्कम, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Check balance of SBI account through Whatsapp: स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) नवीन व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा सुरू केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या या नव्या सेवेद्वारे यूजर्स खात्यातील शिल्लक तपासू शकणार आहेत.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 31 जुलै : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने नवीन WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. या सेवेची घोषणा बँकेनं नुकतीच एका ट्विटद्वारे केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या या नव्या सेवेद्वारे यूजर्स खात्यातील शिल्लक तपासू शकणार आहेत. यासाठी त्यांना कोणतेही स्वतंत्र अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार नाही किंवा कोणत्याही एटीएमला भेट द्यावी लागणार नाही. बँकेनं दिलेल्या या सुविधेचा ग्राहकांना लाभ होणार आहे आणि खात्यातील रक्कम जाणून घेणं त्यांना जास्त सुलभ होणार आहे. एसबीआयने ट्विट करून लिहिलं होतं की, तुमची बँक आता व्हॉट्सअ‍ॅपवर आली आहे. तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक आणि मिनी स्टेटमेंट कुठूनही पाहू शकता. सध्या, व्हॉट्सअ‍ॅपवर एसबीआय वापरकर्ते त्यांच्या खात्यातील शिल्लक आणि मिनी बँक स्टेटमेंट पाहू शकतात. SBI WhatsApp बँकिंग सेवांसाठी, वापरकर्त्यांना +919022690226 वर Hi पाठवावं लागेल. हे करण्याची प्रोसेस स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून खात्यातील शिल्लक कशी जाणून घ्यायची? (How to check SBI account balance through whatsapp?)-
  • सर्वप्रथम तुम्हाला SBI WhatsApp बँकिंग सेवेसाठी तुमचं खातं नोंदणीकृत करावं लागेल.
  • या सेवांची नोंदणी करण्यासाठी, बँकेकडे नोंदणीकृत तुमच्या 10 अंकी मोबाइल क्रमांकावरून WAREG A/c No +917208933148 वर एसएमएस करा.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला +919022690226 वर Hi पाठवावं लागेल.
  • यानंतर तुम्हाला Dear Customer, Welcome to SBI Whatsapp Banking Services! असं लिहिलेला एक लिखित संदेश मिळेल.
यापैकी एक पर्याय निवडणे आवश्यक आहे:
  • खात्यातील शिल्लक
  • मिनी स्टेटमेंट
  • डी-रजिस्टर फॉर वॉट्सऐप बैंकिंग
  • प्रारंभ करण्यासाठी तुम्ही क्वेरी देखील टाइप करू शकता.
  • शिल्लक तपासण्यासाठी 1 टाइप करा आणि मिनी स्टेटमेंटसाठी 2 टाइप करा. यानंतर तुम्हाला खात्यातील शिल्लक किंवा मिनी स्टेटमेंट दिसेल.
याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅप SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना सर्वोत्तम सेवा देखील देतं. या सेवेचं नाव SBI Card WhatsApp Connect असं आहे. या सेवेद्वारे, SBI क्रेडिट कार्ड ग्राहक खात्याचा सारांश, रिवॉर्ड पॉइंट आणि थकबाकीची रक्कम तपासू शकतात आणि कार्ड पेमेंट देखील करू शकतात.
First published:

Tags: Sbi account, SBI Bank News, Whatsapp

पुढील बातम्या