जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PF ची माहिती घेताना तुम्ही चूक तर करत नाही ना? एकाला बसलाय सव्वा लाखांचा फटका

PF ची माहिती घेताना तुम्ही चूक तर करत नाही ना? एकाला बसलाय सव्वा लाखांचा फटका

PF ची माहिती घेताना तुम्ही चूक तर करत नाही ना? एकाला बसलाय सव्वा लाखांचा फटका

तुम्ही सुद्धा ऑनलाइन कस्टमर केअर नंबर सर्च करत असाल तर तुमची एक चूक कधीतरी तुम्हाला वाईटरित्या अडकवू शकते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 नोव्हेंबर : सरकारी असो की खाजगी क्षेत्र प्रत्येक नोकरदारासाठी पीए महत्त्वाचा विषय आहे. पीएफ शिल्लक तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. ते तपासण्यासाठी आपण अनेक वेळा ऑनलाइन सर्च करतो, पण त्याची पद्धत अगदी सोपी आहे. तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटवर जाऊन किंवा उमंग अॅपच्या मदतीने पीएफ शिल्लक तपासू शकता. मात्र, आपण पीएफ शिल्लक तपासताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा कधीही नुकसान होऊ शकते. एका व्यक्तीला असाच फटका बसला आहे. सायबर गुन्हेगारांनी मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीची 1.23 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा व्यक्ती ईपीएफओचा कस्टमर केअर नंबर ऑनलाइन शोधत होता. चला जाणून घेऊया या व्यक्तीने कोणती चूक केली, ज्यामुळे त्याच्या खात्यातून पैसे चोरीला गेले. काय आहे संपूर्ण प्रकरण? वास्तविक, इतर अनेक वापरकर्त्यांप्रमाणे, या व्यक्तीने देखील ऑनलाइन कस्टमर केअर नंबर शोधण्याची चूक केली. रिपोर्ट्सनुसार, हा व्यक्ती ईपीएफओच्या हेल्पलाइन नंबरसाठी ऑनलाइन शोधत होता, तेव्हा त्याला फसवणूक करणाऱ्यांनी अपलोड केलेला नंबर आला. मात्र, याची काहीच कल्पना नसलेला पीडित व्यक्ती या जाळ्यात अडकला. फसवणूक करणाऱ्यांनी पीडित व्यक्तीला रिमोट ऍक्सेस अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले आणि त्याच्या खात्यातून 14 वेगवेगळे व्यवहार करून 1.23 लाख रुपये लंपास केले. वाचा - हॅकर्सपासून खातं सुरक्षित कसं करायचं? RBI ने दिली महत्त्वाची माहिती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी येथे राहणारा पीडित एका खासगी कंपनीत काम करतो. 7 नोव्हेंबर रोजी संबंधित व्यक्ती आपला पीएफ शिल्लक तपासत होता. त्यांनी त्यांच्या फोनवर ईपीएफओची वेबसाइट उघडली. मात्र, साइट लोड झाली नाही. यानंतर त्याने इंटरनेटवर पीएफ कस्टमर केअर नंबर शोधला आणि आलेल्या नंबरवर कॉल केला. या संधीचा फायदा घेत भामट्यांनी सदर व्यक्तीला एक अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगितले, जेणेकरून पीएफ शिल्लक तपासण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. अशा प्रकारे, फसवणूक करणाऱ्याने पीडित व्यक्तीला अडकवलं आणि नंतर त्यांच्या खात्यातून पैसे लंपास केले.

News18लोकमत
News18लोकमत

तुम्ही अशी चूक करू नका तुम्ही देखील कोणताही कस्टमर केअर किंवा हेल्पलाइन नंबर ऑनलाइन शोधत असाल तर काळजी घेण्याची गरज आहे. तुमच्या एका चुकीमुळे खूप नुकसान होऊ शकते. ऑनलाइन उपलब्ध असलेले अनेक ग्राहक सेवा क्रमांक सहजपणे एडीट केले जाऊ शकत असल्याने, लोक फसवणुकीला बळी पडतात. हे टाळण्यासाठी, तुम्ही नेहमी अधिकृत वेबसाइटवरूनच ग्राहक सेवा क्रमांक घ्यावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: epfo news , Pf
  • First Published :
जाहिरात
जाहिरात